Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक ३२७.

१७२१ कार्तिक व॥ १४.

जबानी खेमचंद व॥ नारायणदास दाळवाले परदेशी पेठ गणेश शहर पुणें सु॥ मया तैन व अलफ. लेहून दिल्ही जबानी ऐसीजे पेठ मजकुरी आह्मीं जागा खरेदी केली. त्यांत आह्मी नांदत आहो. हाली ती जागा छटुभाई फरास याची बायको आपली ऐसे बोलोन सरकारांत विनंती करून आह्मास सरकारातून ढलाईताकडून घराबाहेर काढून दिल्हें. त्यास ही जागा रत्नोजी फरास नी॥। सरकार याची त्याजपासून खुशरजाबंदीनें आह्मी घेतली ते समयीं जाग्याविशीं रत्नोजी फरास याचे नावें सरकारचें पत्र आहे. ते पाहोन अडीचशें रुपये देऊन खरीदपत्र करून घेतलें तें पेठकरी यास दाखवून चावडी पेठ मजकूरीची येथे नेऊन पत्र चावडीचे पत्र करून घेतलें ते समयीं चौकशी पेठ चावडी येथून करून आमचे पत्र करून दिल्हें व कोतवालचावडीस खरेदीपत्र व चावडीचे पत्र दाखविलें त्याजवरून त्यांनीही चौकशी करून मोजणी करून पत्र करून सीरस्ता प्रें॥ कबज पत्राचे रुपये व कारकुनी घेऊन भोगवटी यास पत्रें करून दिल्हे आहेत तीं बजिन्नस स्वामीनीं पाहोन माझी जागा घर नांदतें माझें देवावें येविशीं आज्ञा जाहली पाहिजे रत्नोजी जवळ जागा खरेदी करून घेतली तो ही येथें आहे चौकशी येविशीं जाहली पाहिजे सरकारांतून रत्नोजीस खोटा असें करून द्यावें ह्मणजे स्वामी आज्ञा करतील त्यास मान्य आहे सदरहू लि॥ प्रें॥ खरें करून देईन हे लिहून दिल्हें. सई मी॥ कार्तिक शु॥ १४ बी॥ जनार्दन धोंडदेव कारकून दिम्मत मल्हार बाजी हुजूर गार्दी सरकार.