Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

माई ब्राह्मणीन इचें घरी पोथ्या वस्तवाणी भिकाजी मोरेश्वर यांनी ठेविली ते आणिली बाकी कांही राहिली असेल त्याची चवकशी करोन लेहून पे॥ ह्मणोन आज्ञा त्यास ब्राह्मणीनीचें घरी बाळबद पोथ्या गाठोडें दोन होतीं ती बाबू गणेश यांनी नेली पावती घेतली आणिखी चीज वस्त कांही माईचें घरी नाहीं. कदबा लेहून घेतला कीं चिंतोपंताचा याखेरीज सुतळीचा तोडा आंगीं लागल्यास हजार रु॥ गुन्हेगारी देऊं ह्मणोन लेहून घेतलें. कलम १.

खंडोपंत देशपांडे यास व्याजाचें फडच्याच पो। ह्मणोन आज्ञा त्यास धापेचा उपद्रव वृध जाला. चिरंजीव येक होता तो मृत्यु पावला देशपांडे यास घोड्यावर बसावयास शक्त नाही श्रीमंत हरीपंत तात्यांनी आज्ञा केली होती की खंडोपंतास व्याजाचा तगादा न करावा. त्याचे आज्ञेवरोन दोन महिने त्यास आह्मी तगादा केला नाहीं आपली आज्ञा प्र॥ परंतु त्यास आराम जाल्यावर पाठवून देतों. खताची मित्ती पाहोन हिसेब लेहून पाठविला तरी येथे फडच्या करोन घेऊं. तेथेंच पाठवावें असी आज्ञा जाल्यास डोली भाड्यानें करोन आराम झाल्यावर पाठवून देतों. राजश्री धोंडोपंत सुभेदार यांनी आह्मांस सांगितले आणखी येक वेळ स्वामीस पत्र लिहून हिसेबाची याद आणिल्यास उत्तम. नाहींतरी जाईन. स्वामीस विनंती लिहिणें हेंच की देशपांडे वृध फार तरी खताची मितीप्रे॥ याद लेहून पे॥. खत पे॥ ह्मणजे फडच्या करोन घेतों. कलम१.

राणोजी देशमुख पिंपळकर याजकडे येके चाळीस व रीतीप्रे॥ ऐवज घेतला. राणोजी पळोन गेला. त्याचे बायकोनें रुपये दिल्हे. व्याजाची हि निकाल कर्ती तरी स्वामींनीं रोखा व व्याजाचा हिसेब लेहून पे॥. येथें फडशा करोन घेतों. राणोजी असता तरी पाठवून देतो. रोखा हिसेब व्याजाचा जो होईल तो पाठवून द्यावा. कलम १.

राजश्री भिकाजी मोरेश्वर याचे वाड्यांत कोकणचे वऱ्हाडकरी राहिले त्यास आह्मी तसदी दिल्ही ह्मणोन लिहिलें त्यास आह्मी तसदी दिल्ही नाहीं. येथून लिहिणार लबाडीनें पत्रें लिहितात तीं स्वामींनी ध्यानास न आणावी. कलम १.

बाबू कोटवाला याचा चुलता मृत्यू पावला यास अवरोध आला याकर्ता पाठविला नाहीं. बाबूभट मठकर याची पुरसीस करावयाची व त्याचे घरी चीजवस्तू असेल ती बाबूचे गुजारतीनें आणायाची मटकर गावीं नाहीं तो आला ह्मणजे कदन घेऊन रुजुवात करोन बाबूस आज्ञेप्रे॥ पाठवितों वर्ते पाठवला ह्मणोन लिो। परंतु अवरोधामुळें राहिला. च्यार पांच रोज जाले ह्मणजे सेवेसी पे॥ ता. कलम १.

सदरहू कलमें दाहा ध्यानास आणोन आज्ञापत्र येईल त्याप्रे॥ वर्तणूक करूं हे विज्ञापना.

पे॥ छ २७ जिल्काद सन अर्बा समानीन.