Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीसांब: सपुत्रो ४.
लेखांक १७९.
१६९८ भाद्रपद शुद्ध ३ सोमवार.
राजश्री लक्ष्मण अपाजी यासि:-
सु॥ सबा सबैन. तोतियाच्या कांहीं खुणा अर्ध्या अर्ध्या ल्याहाव्या ह्मणोन लि॥. तरी सेवेटील स्वारीस तीर्थरूप भाऊसाहेब हिंदुस्थानांत गेले तेव्हां मजपासीं अगोधर काय बोलिले ? तेव्हां हिंदुस्थानांत जाण्याचा निश्चय केला. तीर्थरूप कैलासवासी नानासाहेबांचीं व त्यांची व आमचीं भाषणें कशीं कशीं जाहालीं, ते सविस्तर सांगावें. त्यावेळेस विठ्ठल शिवदेव व फडणीस व दादू फौजदार वगैरे कोणते कोणते मागून घेतले कोण दिल्हें, तें समईं तीर्थरूप उभयतांचीं व माझीं भाषणें कशीं जाहलीं तें सविस्तर सांगावें. दोनच जाबसालावर कळेल. असो. येव्हां त्यास खुणा पुसाव्या, तेव्हां परीक्षा करावी. ऐसियासी हा प्रसंग परीक्षा करावयाचा नव्हे. परीक्षा आह्मांस पुर्ती कळलीच आहे. संशय नाहीं . तुह्मीं नवे, म्हणोन तुम्हांस संशय. पत्रावरून तरी पूर्तीच परीक्षा कळलीं. पवमान दीड अध्याय येतो, ह्मणोन तुमचे लिहिण्यांत. तरी न कळे अलीकडे शिकण्याचा प्रकार तरी ध्यानांतच आहे. तुह्मांस कळावें. अबदूल गनी वृद्ध गेले, परीक्षा करून आले, ह्मणोन लिहिलें. तरी प्राय:वृद्ध व वृद्ध स्त्रिया व भट आश्रित मंडळी यांस खरा वाटतच आहे. गंगाधरभट कर्वेदेखील संशयाची गोष्ट सांगत होते. अश्याच्या बुद्धि किती, ध्यानांतच असेल. त्याजपासीं कांहीं जादू असेल, असेंही तर्कांत येतें. परंतु ते जादू किरकोळांवर पडते. मोठयांवर पडत नाहीं, ऐसेंहि दिसते. अबदूल गनीवर जादू असेल अथवा कांहीं द्रव्य मिळालें तरी हेही मोठी जादूच ! असो ! इतकें तपशिलाचें तूर्त कांहीं प्रयोजनच नाहीं. त्यास खरा अथवा खोटा ह्मणावें, ऐसा समय नाहीं. त्याचे परीक्षेचे दिवस नव्हते. तुह्मांस मात्र कळावें, ह्मणोन तपसील लिहिले असे. खरा कळल्यावरी मजपासून अणुमात्र अमर्यादा होणार नाहीं, हे खातरजमा ठेवणें. वरकड तुमचीं पत्रें दहा वीस बंद आले. सर्वहि वाचले. उत्तरें कामाचे मजकुराचीं मात्र लिहिलीं प्रयोजन नाहीं. त्यांचीं उत्तरें कशास ल्याहावी ? तुह्मीं आंगरेजाची मर्जी दुरुस्त राहे तें करणें. हें काम बहुत मोठें, लहान नाहीं; तेथें काम नाहीं असेंच दृष्टीस पडेल, तेव्हां हजूर येणें. तेथें दुसऱ्यास पाठऊं. जोंपर्यंत कामांत जीव दिसतो तोंपर्यंत जलदी करणें उचित नाहीं. छ २ साबान.
(लेखनावधि:)