Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीसांब: सपुत्रो विजयते.

लेखांक १८०.


१६९८ भाद्रपद.

राजश्री लक्ष्मण आप्पाजी गोसावी यांसि:-
सु।। सबा सबैन मया व अलफ. इकडील मजकूर तरी, जनराल यांस कळवावा यास्तव सविस्तर खुलासा मजकूर तुह्मांस लिहिला आहे. त्यास, जनराल याच्या कानावर घालून त्यास विचारणें. कोणती मसहलत सांगतात, ते आह्मांस कळावी. सांप्रतकाळीं आमचे दोस्त अंगरेज आहेत. त्यांचे सल्लेनें करणें तें करावें. येथील मजकूर :-

भाऊकडून नरसिंहाचार्य व यज्ञेश्वर दीक्षित दोघे शास्त्री आले. त्याचा मजकूर कीं, माधवराव नारायणाचें नांवें सिक्का पूर्वीं केला मोडितों. आमचें नांवें करितों, नारायणराव याचा मूल नव्हे, तो खोटा सबब आह्मीं पूर्वींच न करावा, परंतु तेव्हां गरजेसाठीं केला, आतां आपण आले ह्मणजे सर्व दौलत आपली, मजला कारभार सांगावा, आपलें आज्ञेप्रों। मी कारभार करीन, कैलासवासी तीर्थरूप नानासाहेबांचे जागीं आपण आहांत याप्रों त्याचा मजकूर. कलम १.

हा मजकूर बहुत चांगला. परंतु भाऊ खोटा असल्यास, दगासा वाटतो. खरा असिल्यास, पेंच नाहीं. आह्माकडील मजकूर तरी : येथें जमीयतदारी नाहीं. परंतु औरंगाबादेकडून कांहीं राऊत व गाडदी आणविले आहेत व डबईहून थोडेसे येतील. सुरत अठ्ठाविशींतील कांहीं मिळत नाहीं. तलासांत आहों. परंतु पांच हजार पावेंतों राऊत व प्यादे मिळतील, दिवाळीपावेतों जमा होतीलसें दिसतें. परंतु येतील तेव्हां खरें. केवळ आपलेंच बळानें मातबर मसलत होईलसे दिसत नाहीं. थोडीबहुत चालतच आहे. फिरंगी तरी लबाड व नाकुवत. अंगरेज तरी बंगाल्याचा अथवा विलायतेचा हुकूम च्याहातात. तेव्हां कसे करावें ? कलम १.

अंगरेजास दरम्यान घेतल्यानें बळकटी. परंतु आह्मी विलायतेच्या अथवा बंगाल्याच्या हुकुमाची वाट पाहतों. त्यास, हे मध्यस्त असल्यास मग लढावयास तयार कसे होतील ? हा दोष. याची काय तोड करावी ? जनरल वगैरे अंगरेजास पुसावें.
फितुरियाकडून राजश्री बाबुराव बल्लाळ काणे आले. त्याचा मजकूर : पांच सात लक्षाचे परगणे घ्यावे. रेवतीरीं राहावें. निदानीं दाहाचेही कबूल करितील व सुरळीत परगणे घ्यावे आणि होळकर सिंदे दरम्यान देतों. त्यांचे विद्यमानें रेवातीरीं राहावें. बहुधां अमदाबाद वगैरे मर्जीचप्रों पंधरा वीस लक्ष पावेतों देतील असें तर्कानें दिसतें. इतका मजकूर बाराभाईकडील नजरेस येतो. कलम १.

आह्मांस अंगरेज दरम्यान घेतल्याशिवाय भरंवसा पुरवत नाहीं. अंगरेज घेतले तरी येक दोष आहे. भारभाईस तोतियानें बहुत ताण दिल्हा आहे. तमाम किल्ले तोतियास वश जहाले. त्याजपाशीं काय करामत आहे, हें कळत नाहीं. याजमुळें आमच्या मसलतीस जीव आहे. येक महादजी सिंदा मात्र लढावयास पुढें जाहाला आहे.

तोतिया जनकोजी खरा जाहाल्यास पेंच पडेल. यास्तव आगारी घेतली आहे. याजमुळें बारभाई आमचे पाय धरीलसें दिसते. कलम १.

हे कितेक समक्ष बोलणें जनराल याचे व्हावें हें मानस आहे. त्यांस, आम्ही कोणत्या मुकामी यावें ? साटीच्या रोखें यावें किंवा मुंबईसच यावें, हें जनराल याची सलाह कमी आहे, तो त्याचा खुलासा काढणें. कलम १.

येकूण कलमें साहा लिहिलीं आहेत. त्यांत भाऊसीं कसें बोलावें, बारभाईसीं कसें बोलावें, भेटीचा सलाह कसा देतात, तें पुसावें. जाणिजे. छ १२. कारनेल किटिंग व होम, इष्टोल, वारलिस वगैरे जे जे इष्ट असतील त्यांस सलाह पुसावी. खबर घ्यावी. मित्रता वाढवावी. उपयोगी आहेत.

(लेखनावधि:)

कान्हु कुटा व उदेभान दोघे पाठविले आहेत. जबानीवरून कळेल. हाच मजकूर जबानीं आहे; परंतु प्रगट न करणें. मसलत येकच ठहरली नाहीं.