Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीसांब: सपुत्रो विजयते.
लेखांक १८२.
१६९८ आश्विन शुद्ध ३.
राजश्री सुखाराव बुरुडकर गोसावी यांसी:-
अखंडित लक्ष्मीअलंकृत राजमान्य र॥ रघुनाथ बाजीराव प्रधान आशिर्वाद. सु॥ सबा सबैन मीया व अलफ. तुमचे एकनिष्ठेचे अर्थ कितेक र॥ लक्षुमण आपाजी यांणीं हुजूर विदित केलें. त्यावरून संतोष जाहाला. तुम्ही पुरातन सेवक, पदरचे. तीर्थस्वरूप कैलासवासी रावसाहेबांपासोन आजपर्यंत निष्ठेनें सेवा करीत आलां. दरम्यान कितेक पेच पडिले. तथापि समय रक्षून सेवटीं निष्टा साहेबसेवेवरीच ठेविलीत. शाबास तुमचे खानदानाची असे ! त्यांस या उपरी तालुके सुवर्णदुर्ग येथील ! त्यांस या उपरी तालुके सुवर्णदुर्ग येथील किल्याचा बंदोबस्त जंजिऱ्यासुद्धां अलंगनौबत चौकी पाहाऱ्याचा करून हुशार राहाणें, बारभाईचे लोक आल्यास पारपत्य करणें. याखेरीज विजयदुर्ग, अंजनवेल, रत्नागिरी येथील किलेकऱ्यांस सांगोन त्यांची खातरजमा करणें आणि हुजूर लेहून पाठवणें. ह्मणजे सनदा दिल्ह्या जातील. यासमई सेवा करून दाखविल्यास विशेष कृपा तुम्हांवर होऊन, तुमचे मनोदयानुरूप सर्व घडोन येईल. खातरजमा ठेवणें आणि किलें जितके सरकारांत रुजू होतील तितके करून घेणें. कितेक आज्ञा करणें ते तुम्ही आपलेकडील शाहाणा माणूस जलद हुजूर पाठवून देणें. सुवर्णदुर्गास आरमार आहे, तें तयार असो देणें. मागाहोन आज्ञा होईल, त्याप्रमाणें करणें.