Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीशंकर.

लेखांक १२७.

१६९७ पौष वद्य १४.

राजश्री लक्ष्मणपंत आण्णा स्वमीस:-
पोष्य सखाराम हरि साष्टांग दंडवत प्राा विनंति येथील वर्तमान ताा पौष वद्य चतुर्दशीपर्यंत सुखरूप जाणून स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष. आपण पत्रें विस्तरें मजकुराचीं श्रीमंतास वद्य तृतीयेचीं पाठविलीं तीं एकादसीं पावलीं. आह्मांस संकलित हवाला देऊन चिठीमागें तरवारेचा
-----------------------------------------------------------------------------------------------------------
मजकूर लेहून पाठविलीं, त्यावरून व सरकारचे पत्र पाहून सर्व कळलें. सारांश, तूर्त सर्व मसलत, अपटण आले, त्याजवर आहे. येविसीचें साधन जनरालापासून वगैरे जसें पडेल तिकडोन पाडून अण्णा ! मसलत सिद्धीस जाई, तुमचे आमचे मनोदयें व श्रीमंताची इच्छा पूर्ण होये, ते गोष्ट हरप्रेत्नें, अर्थें, प्राणें, खर्च तुमचा आमचा जाला तरी करून, लढाईचीच ठरून, फितुरिभाचीं पारपत्यें घडेल ते गोष्ट, अण्णा ! करावी. मुंबईवाले जनराल यांचे हातून अपटण व मुंबईतील कोशलदार ऐसे लोभाविष्ट. पेशजीचे दारमदाराखेरीज आणखीही उमेदवार करून पल्यावर आणावे. बल्की, कलकत्तेवाले व कुंपनी यांचीही आणखी आशा दाखवावी. परंतु सर्व प्रकारें मसलत शेवटास न्यावी, हेंच घडवावें. सर्व मदार तुह्मांवर आहे. मसलतीचा मोहरा सर्व अण्णा ! तुमचे माथां आहे. यशच घेऊन, आह्मां सर्वांत वरिष्ठता करून दाखवावी. तुह्मी प्रसंगानुरूप समय पाहून बोलाल, कबूल कराल, तें श्रीमत् निभावितील. येविसीं सविस्तर कोठवरी ल्याहावें ? वरकड इकडील सर्व अर्थ, श्रीमंताचे आज्ञेची पत्रें आहेत, त्यावरून कळतील. वरकड सर्व राजकारणें वगैरे जीं साधनें त्यांची लक्ष्यें सर्वांची इंग्रजाकडे आहेत. याचे अनुकूलतेवर सर्व अनकूलता आहे. याणीं नेट मात्र धरावे. लढाई न पडतां महिन्या दोन महिन्यांत मसलत सिद्धीस जाऊन, सर्व लोभ इंग्रजांचे प्रविष्ट होतील. गुंता नाहीं. कळेल तैसी खर्चाची खातरजमा करावी. वरकड घराऊ मजकूर तरी :- तूर्त कारनेलीची बेमर्जी आह्मांवर आज च्यार पांच दिवस फारच जाली आहे. कारण कीं, गोविंदरायांचें बोलणें आह्मी बोलतों. यामुळें त्याचे मनांत विक्षेप वाढत आला. बारीक मोठे जाबसाल सरकारतर्फेचे करणें पडतात. यामुळें, वकिलीस बोलणार त्याणीं त्यांस मन मानेसें चिडविलें आणि तुफान उठविलें कीं, सखाराम हरीचे राऊत जाऊन कही मारितात. फितुरियाकडील बेदड वगैरे येऊन फौजा घाट उतरल्या. नवापुरावर पांच सात हजार फौज आली. तेव्हांपासून नित्य कहीवर घालवितात. एथें दोन तीन महिने गुजरले. चारा जवळ नाहींसा जाला. लांब जावें लागते. एकीकडे कहीस रखवालीस जावें तों भलतेकडे दगा होतो. फत्तेसिंगाकडीलहि पेंढारी, राजपिंपळेवाले वगैरे यांचेहि राऊत फिरतात; परंतु सांप्रत फितुरियांकडीलच लोक येऊन, मारामार करून, कहीचे घोडे लष्करचे आजपर्यंत पांच सासें नेले. हाली इंग्रजाचे गाडे एकादशीस सुरतेहून येत होते ते लुटले. माणसें तोडलीं. फितुरियाचें पेंढारे यांनीच कृत्य केलें. त्यासमयीं लष्करची कधीहि पाडली. त्यांत माणसें दहावीस धरून नेलीं. तीं नवपुरास नेऊन सोडलीं. ऐसें असतां, आह्मांवरच तुफान घडलें. सुरतअठ्ठाविशीचा अंमल गोविंदरायाकडे होता, तो फत्तेसिंगाकडे द्यावा, हे मोठी रदबदली कारनेलीची. इंग्रजाजवळ गमाजी पाटील वगैरे कारकून. त्यांचे बोणियावर पार. तेव्हां उत्तर हेंच कीं, फत्तेसिंगाकडील ऐवज झाडून पंचवीस लाख.पैकीं गोविंदरायास तिजाई मूलूक होता तो हिसा तरी सारा ऐवजाचा वजा करून, सोळा लक्ष सासष्ट हजारांचा भरणा करावा. ह्मणजे अंमल सोडितों. निदानीं तूर्त पांच लक्ष तरी द्यावें. पेशजी साडेसातपर्यंत पावले आहेत. त्याजकडील दहाचा भरणा जाला तो ऐवज अमानत तुह्मांजवळ आहे तो द्यावा. ते देईनात, ह्मणोन अंमल सोडिला नाहीं. गोविंदरायाचा अंमल कमाविसदार राखून सरकारांत वसूल आणविला. तूर्त वोढीस लाख पन्नास हजार रुपये घेतले. यामुळें इंग्रज आह्मांवर फारच रुष्ट, आह्मीच घडो देत नाहीं ह्मणोन, जाले. आणि हेनिमित्त मुद्दा पत्ता नसतां नाहक ठेऊन मारूं, हल्ला करूं, श्रीमंतानीं आह्मांस निरोप द्यावा किंवा सखाराम हरी घालवावे, पारपत्य करावें, नाहीं तरी आह्मी करितों, ऐसें अटीस आले. विलाज नाहीं ! श्रीमंतही लाचार जाले ! निरुपाय झाला ! मोठे संकट सर्वांस प्राप्त झालें. केवळ निदानास गोष्ट आली. श्रीमंतही खरे लाचार जाले. तेव्हां पुढें प्रसंग जाला तो पुरवणीवरून कळेल. हे विनंति.