Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १२४.
१६९७ पौष शुद्ध १२.
पुरवणी राजश्री लक्ष्मण आप्पाजी गोसावी यांसी :-
सु॥ सीत सबैन मया व अलफ. कारनेल आप्टण कलकत्त्याहून रवाना जहाले होते. ते पुणियास येऊन पोंहचले तेव्हां मसलती लांबेलसें दिसतें. त्यास, अपटणाची कांहीं दुराशा असली अगर सर जनराल कलकत्त्येकरास दहा पांच लाख कबूल केलियानें लडाई सुरू होऊन फितुरियाचें पुरतें पारपत्य होत असलियास जनरालाचे विचारें कबूल करोन मसलत शेवटास न्यावयाचें करणें. सध्यां आपटण आला आहे, त्यास याची दुराशा कांही आढळलियास, कबूल करावें. व कलकत्तेकराची दुराशा जनरालाकडून कळली तरी प्रसंगोत्तर दहा पांच पडती तरी कबूल करोन मोगलसुद्धां फितुरीं नेस्तनाबूद करावें. याप्रमाणें होत असलियास करणें. जाणिजे. छ १० जिलकाद. बहुत काय लिहिणे ?
हरयेक देण्याघेण्याची गोष्टी प्रयोजन पडल्यास करावी. उगीच कशास करावी ? येथें कारनेल ह्मणतात कीं आह्मी पहिल्या करारासिवाय कांही मागत नाहीं. इंग्रेजाचा स्वभावहि आहे कीं हरयेक कारभार पक्काच करावा. शंभरदां मागों नये, लटकें बोलों नये, ऐसें तरी आहे. तथापि बनेल प्रसंग तसा करावा. तुह्मांस आमची मर्जी विदितच आहे. इंग्रेजाची कारभाराची रीतही वाकीफ जहाली आहे. तेव्हा बनेल प्रसंग तसें करावें. सारांश, आपलें काम मनोदयानुरूप होय तसें करावें. ज्या रीतीनें आपले मतलब साधतील व ओझें जड न पडे तसें बोलणें. छ मजकूर.
(लेखनावधि:)