Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक १२३.

१६९७ पौष शुद्ध ३.

राजश्री लक्ष्मण आपाजी गोसावी यांसि :-
सु॥ सीत सर्बैन मया व अलफ. फत्तेसिंग गायकवाड याजकडील तेरा लक्ष रुपयेपर्यंत आले, असें फत्तेसिंगाकडील कारभारी सांगतात. इंग्रेज दहापावेतों वसूल सांगतात. सरकारांत साडेसहापावेतों वसूल झाला आहे. कारनेल व होम दरबारास आले, तेव्हां तुह्माविसीं जनरालानीं लिहिलें आहे, हा मजकूर सांगितला व फत्तेसिंगाच्या ऐवजाविसीं लिहिलें आहे. परंतु हुकूम आला नाहीं. कापड वगैरे जिन्नस आपले काय उपयोगी, ऐसा मजकूर लिहिला आहे. याजवरून अर्धी परवानगी तरी आहे. परंतु हुकूम नाहीं, ऐसें बोलले. ऐसियासी, आमची बहुत ओढ हें जाणून मागितल्यास कांहीं कापड वगैरे देतीलसें दिसून येतें. परंतु, त्याचा मजकूर कांहीं बोलण्यांत नाहीं. ऐवज आलाच नाहीं, ऐसें बोलतात. यास्तव त्यास निक्षूण ताकीद यावी कीं, जो जिन्नस फत्तेसिंगाकडील आला असेल तो बाजार- निरखाचे भावें देणें. त्याप्रों फत्तेसिंगाचे ऐवजांत मजुरा पडतील. सोनें रूपें, कापड, जवाहीर जें असेल तें देणें, ह्मणून हुकूम यावा तेव्हां आह्मांस प्राप्त होईल. दोन तीन लक्षांचा जिन्नस व नक्त मिळोन आल्यास महिनाभर स्वस्थ चालेल. नाहीं तर कांहीं अबरू रहातां दिसत नाहीं. नित्य दहा बारा हजार रुपये तलब चढते. पैशास ठिकाण नाहीं. बंगाल्याचे हुकुमाची वाट किती दिवस पहावी ? कारनेलीचा अथवा जनरालाचा दोष नाहीं. आपले दैवाचा दोष आहे ! याचा तपसील किती लिहावा ? जाणिजे. छ २ जिलकाद. बहुत काय लिहिणें ?

(लेखनावधि:)