Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ९९.
१६९७ आश्विन शुद्ध १५.
शेवेसी लक्ष्मण अपाजी कृतानेक सां नमस्कार विज्ञापना ऐसीजे. येथील वर्तमान ता। आश्विन शुद्ध पौर्णिमा रविवारपर्यंत महाराजाचे कृपेंकरून यथास्थित असे. विशेष. मुंबईस पोहचल्यावर जनरालाची भेट होऊन बोलणें जालें. त्या मजकुराची पत्रें दोन सेवेसी पूर्वी पाठविली आहेत. पावोन वृत्त कळलेंच असेल. जनरालास अभिमान मोठा पडिला आहे. मेस्तर टेलर खामखा काम करून येतो, हा भरंवसा यांस आहे. त्याचें पत्र यावयास पन्नास दिवसांची मुदत जनरालानीं सांगितली होती. त्यास, तेरा दिवस जाले. बाकी सवा महिन्याची प्रतीक्षा आहे. आज्ञेप्रों खर्चाविसीचे मार बोलिलों, परंतु ते गोष्ट घडत नाहीं. तपसीलवार पूर्वी लिहिलेंच असे. हालीं नवीन मजकूर बातमी :-
बारभाईची काही जमीयत चार हजारपर्यंत साष्टीचे रोंखावर तळोजे म्हणून गांव आहे, तेथें खाडीपलीकडे आली. तेव्हां जनरालानीं आपली जमीयत साष्टीचे कुमकेकरिता हजार माणूस मदरासी पाठवून ठाण्याचा बंदोबस्त केला व पुरंधरास पत्रें पाठविलीं कीं, लढाई बंद बंगाल्यांतून जाली असतां साष्टीवर तुमची जमीयत आली हें काय, तैसेंच तुमच्या मनात असिले तरी सांगणे. या अन्वयें पाठविली असेत. हे गोष्टीस बारा दिवस जाले. अद्यापी बारभाईंची जमीयत तळोज्यासच असे. बारभाईकडून अंतर पडावें ह्मणजे बंगालेवाल्यास जाबसाल करावयास येईल. याप्रों कलह निर्माण जाला आहे. परंतु विस्तार होतां दिसत नाहीं. कलम १ जलदीनें खुषकीनें पत्रें स्वामीकडे पाठवावीं तरी, सांप्रत बारभाईंनीं बंदोबस्त फार केला आहे. कासीद निभणार नाहीं. यास्तव जलमार्गें रवाना करितों. हीं पोंचावयास च्यार दिवस अधिक लागत असतील, परंतु खुषकीनें उपाय नाहीं. जहाजांतून रवानगी परतंत्र म्हणून विलंब लागतो. कलम १
पु।। मर्जी प्रसन्नसी दृष्टीस पडिल्यापासून कांहीं कांहीं युक्तीचे वाटेनें बोलोन, येथें तीन कोशलदार १ मेस्तर द्रेपर १ मेस्तर रामसी १ मेस्तर आसीलेबारहन येकूण तीन आहेत, यांची भेट घेतली. वस्त्रें दिल्हीं. यांत द्रेपर मात्र सरकारचे लक्षांत विशेषसा नाहीं. उभयतांत तरी पेंच आहेत. त्याचेहीं म्हणण्यांत कीं, खासा बंगाल्यास मेस्तर टेलरानें सारा मजकूर समजाविल्यानंतर लढाईच ठरत्ये. चिंता न करणें. असें वारंवार समाधान करितात. येथें पुणियाहूनही पत्रें कांहीं कांहीं येत असतात. त्याचा अर्थ मनास आणून मागाहून सेवेसी लिहितों.
करनेल अपटण बंगाल्याहून पुरंधरास रवाना जाला होता तो निजाम अल्लीखान याचे मुलकांतून बारभाईचे अमलाचे सदरेस येऊन पोंहचला. इंदोरी म्हणून गांव आहे. त्या सुमारास कोणी दगा करून मारून टाकिला. बहुतशी जमीयत समागमें नव्हती. होते त्या साकर्तो मारिलें. बारभाईचें अमलांत मारिलें. याप्रों येथें खबर मात्र आहे. पक्की असली तरी दुणावेल. लिहिलीं येतील. शोध करून मागाहून सेवेसीं लिहितों. कलम १.
चेनापट्टणाहून कासीदपत्रें घेऊन मुंबईवाल्याकडे येत होते. ते पत्रें कल्याणास यांनी धरून पुण्यास पाठविली. कासीद कैदेंत होते, त्यांतून येकजण पळोन आला. त्यावरून बारभाईचे कारकून येथे आहेत, त्यांस पत्रें आणून देणे ह्मणून ताकीद केली. तथापि अद्यापी पत्रें इंग्रजाचे हातास आलीं नाहीत. याप्रों किरकाली गोष्टी होऊन, इंग्रजास विषाद येत असतो. कलम १
जनरालास बंगालवाले आपले ऐकतीलसा भरंवसा बहुत आहे. यास्तव हे म्हणतील तैसें तूर्त ऐकावे. मलाह उचित आहे. स्वामींनी कोणेविसीं जलदी करू नये. यांणी अभिमान सोडिल्यास खोटी थोडी महिन्यांची राहिली आहे. इंग्रजाचे सोबतीचा गुण व्यर्थ होणार नाहीं. काही येक प्रकारे चांगलेच होईल. जनरालास पत्रें तुमचे लिहिल्यावरून व लक्ष्मण अपाजी बोलिला तो मजकूर त्याणीं हजूर लिहिला आहे त्याजवरून तुमचे भरंवशावर मुदतीची प्रतीक्षा करीत आहे. याअन्वयें मर्जीस आल्यास पत्रें पाठवावयाची आज्ञा केली पाहिजे. वरकड मार हसोट आंकलेश्वर व तेती लक्षामध्ये व वसई साष्टीचे वतनामध्ये बोलावयाचे आहेत. परंतु समय नाहीं. पुढे लडाई सुरू जाल्यावर ठीक पडेल. यास्तव जलदी करीत नाहीं. याचा