Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ९६.
१६९७ श्रावण.
श्रीमंतास जाबसाल ल्याहावें. इष्टोलाविसींचा मजकूर येण्या राहण्याचा तेथें दोघे ममतेचे आहेत.
१ मेस्तर हो . १ मेस्तर हटली, गाईकवाडापों. दाहा किटीणीकडे आले. पो साडेसाहा सरकारांत आले. बाकी ऐवज अमानत ठेवावा. दरमहा घेतला पाहिजे, ह्मणून किटीण ह्मणतो. त्यास, दरमाहांत माहाल लाऊन दिल्हे आहेत. मसलत सेवनास गेली पाहिजे. त्यास, जनरालास पुसोन दोहोंचे जमेची घेऊन पाठवणें ह्मणून पत्रीं आज्ञा. त्यास, दरमहाचे ऐवजांत गाइकवाडाचा ऐवज घेणें, हें सेवकास अगोदरच समजलें आहे व सेवेसीही लिहिलें आहे. हालीं यास पुसावें तरी हे ऐवज देवीत नाहीं आणि उगेंच हलकें व्हावेंसें होतें. महालाचा तपसील तरी उज्याड मुलुक आहे. आमोद तरी नेहमीं दिल्ही. हसोटचा कजीया ऐसा. हे तपसिलाखालींच जे समजोन कांहीं बोलिलों नाहीं. बंगाल्याचा हुकूम आलियावर सर्व नीट होईल.
कारनेलीची वाईट गोष्ट जनरालाजवळ आजपर्यंत बोलिलों नाहीं. व मागील गोष्टीचें प्रयोजनही नाहीं. सेवकाचा दोष निवारण व्हावा ह्मणून दुभाषास दाखवावयाकरितां सेवकाचे पत्रावर मोहर करून पाठविली, ह्मणोन पत्रीं आज्ञा. त्यास, मोहरेचें पत्रच आलें नाहीं. तेव्हां शोध करावा.
ओझ्यास उंटें पन्नास व सासे बैल दिल्हे असतां, हजार गाडे आणावयास डबईस माणसें किटणीनें पाठविलीं आहेत. येविसीं बोलून हुकुमाप्रों चालत तें करणें, ह्मणून पत्रीं आज्ञा. त्यास, खंबाइताहून निघतेसमयीं आमचें वोझें दोन तक्षिमा न चाले म्हणून राहिले. एक तक्षम मात्र आलें. त्यास, तंबुखेरीज इंग्रजाची राणगत जाली, म्हणोन मेस्तर वारलीस बोलत होता. त्यास, वोझ्याविसींची गोष्ट त्यास रुचणार नाहीं. यास्तव तूर्त बोलणें ठीक नव्हे. बंगाल्याची अवधी होऊन जाजती दिवस जात आहेत. तात्पर्य उगेंच रहावें हें ठीक दिसतें.
अवधी राहिली नाहीं. प्रसंगास्तव बोलितों. आज्ञेपूर्वींच सारे अर्थ सेवकाचे ध्यानांत आहेत. परंतु हा समय नाहीं. याचा संतोष राहून जें होईल तें करणें उचित. आपला काल प्रतिकूल आहे. या समयांत एकादी गोष्ट बोलतां बोलतां त्याणीं वाईट मानिल्यास जर सनद त्याजवळ नसिली तरी पुढें ऐवज सरकारांत मागतील. यास्तव समज द्यावी. याशिवाय कांहीं दिक्कत असिल्यास आज्ञा व्हावी. १ सुरतकर मोगलाकडील बाकीचा फडशा निमेवर जाला. त्यास साऱ्या ऐवजाचें कबज सुरतकर मागतो. येविसीं जनरालास बोलोन साराच ऐवज सुरतेस येई, ऐसीं पत्रें पाठवावीं, भडोजेस निम्मे, सुरतेस निम्मे, ऐवज द्यावा, ऐसा करार. तेव्हां कराराप्रमाणें त्याजवळ दस्तऐवजी असली पाहिजे.