Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ९८.
१६९७ भाद्रपद शुद्ध १३.
श्रीमंताकडे पत्रे रवाना, भाद्रपद शुद्ध १३ गुरुवार मुकाम भडोज :-
मेस्तर माष्टीन व मेस्तर फ्लेचर यांचें ह्मणणे : लडाई बंद जाहलियाची तकसीर जनरालाकडे अथवा कोषला याजकडे नाहीं. बंगाल्यांतून हे गोष्ट जाली आहे. इतके दिवस सरजनराल नव्हता. आह्मी श्रीमंताची कुमक केलियावर विलायतेहून आला. त्याजकडे मेस्तर टेलर पाठविला आहे. पंधरा दिवस, निदान वीस दिवसांत बंगालियास पोहोंचेल. तो सरजनरलास समजाऊन सांगोन खामखा गेल्या दिवसापासून दीड महिन्यांत परवानगी घेऊन पत्रें पाठवून देईल. तोपरियंत श्रीमंतांनी स्वस्थ असावें. इंग्रेजी लष्कर श्रीमंतासमागमें राहील. जनरालानें श्रीमंताचा हात धरिला आहे तो कदापि सोडणार नाही. श्रीमंताची बाजी सिध्धी जाईल. फिकीर करूं नये. बंगालेवाले मुमईकराची गोष्ट ऐकतील, ऐसें दृष्टीस येतें. याप्रमाणें बोलले. २
करनेल यांनी निशापत्र जातीनें लेहून दिल्हें. हें मिस्तर माष्टीनास व मेस्तर फ्लेचर यांस ठाऊक नाहीं. हें वर्तमान थोडेसे कळल्यावर त्याणी आश्चर्य केलें. या उभयतांस ठाऊक नाहीं, तेव्हां जनरालासही ठाऊक नसलेसे आहे. ते मुंबईस गेल्यास सर्व कळेल. उभयतां ह्मणत होते कीं, गोविंदराव गाइकवाड यांनी जनरालास पत्र पाठविलें कीं श्रीमंतांनीं फत्तेसिंग याजपासून रुपये घ्यावयाचा करार केला, यांत आमची खुषी आहे ह्मणोन पत्र पाठविलें असतां आतां कां श्रमी होतात ? त्यास, मीही समयिक उत्तर केलें. त्यास, याप्रमाणें सेनाखासखेल याणीं पत्र पाठविलें की काय, याचा शोध उगाच असावा. १
मेस्तर शहाकडे कांही अपराध असल्यास महिन्या पंधरा दिवसांत छाण करतां कळेल. अंगी असल्यास त्यास बरतर्फ करणार, त्याजकडे दोष फार आहेत, ह्मणोन इष्टोल सांगत होता. १
नर्मदेस पूर मातबर आला. यामुळें उभयतां मेस्तरांनी आह्मांस राहऊन घेतलें. पाणी उतरलें ह्मणजे जावें. पलीकडे कमी नदी आहे तीस पूर आला आहे. नर्मदेचा पूर उतरेल तेव्हां तेथे उतार सांपडेल. तेथें नावा नाहींत. उतार अवघड. ह्मणोन राहऊन घेतलें.