Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६३०
१७२४ माघ.
++ विलें आहेत. ते सरंजाम सुध्धां मौजे विंचूर परगणें उत्राण येथें येऊन पोहचलें. सरंजाम थोडा ह्मणून स्यांणी हिंमत घरून आणखी स्वार व पाव लोक जदीद ठेविले आहेत. त्यासुद्धां त्यांचा सरंजाम दीड हजार स्वार व दीड हजार गाडदी यो। तीन चार हजारांचा भरणा त्यांचा आहे. लौकरच येऊन पोंहोंचतील. यानंतर राजश्री गोपाळराव राजेबाहादर मालेगांवास येऊन महिनादीड महिना जाला, राहिले आहेत. म्हणोन त्याजकडे सरसुभाहून पत्रें पाठविलीं कीं, पठाण वगैरे यांचे पारपत्याविषयीं सरकारांतून आज्ञा जाली आहे, तरी सरंजाम सुध्धां येऊन पोंहोंचवावें व राजश्री नरसिंहराव यांणींहि सदरहूअन्वयें पत्रें पाठविलीं. त्याचें उत्तर चैत्र शुद्धांत येतों, ऐसें आलें. परंतु अद्याप आले नाहीत. त्यास सरकारांतून आज्ञापत्र सादर जालें पाहिजे. ह्मणजे सरंजामसुद्धां येतील. सारांश पठाण व पेंढारी वगैरे यांणीं प्रांतांत जागाजागा धामधूम मनश्वी केली आहे व हाल्लींहि बारा तेरा हजार फौजेनसीं आपले जागा मजबुदीनें आहेत. यास्तव त्यांचे मुकाबल्यास आपलेकडील फौजेचा जमाव जाला ह्मणजे स्वामीचे प्रतापेंकरून त्यांचें पारपत्य लौकर होऊन येईल. वर्तमान कळावें, ह्मणून सेवेसीं विनंति लिहिली असे. कृपा करून, ध्यानास आणून आज्ञा करणार स्वामी समर्थ आहेत. सेवेसीं श्रुत होय हे विज्ञप्ति.