Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ५७

श्री
१६९० माघ शुा ४

वेदमूर्ति राजश्री गणेशभट हारडीकर व राजश्री शंकराजी केशव स्वामीच सेवेसीः-

पो विठ्ठल कृष्ण सां नमस्कार विनंति. उपरी येथील कुशल ता माघ शुा ४ भृगुवार जाणून स्वकीय लिहित असावें. विशेष. इकडील वर्तमान तरीः–श्रीमंत फौजेसुद्धां नागपुरानजीक आहेत. श्रीमंतांच्या फौजेस व भोंसल्यास साठसत्तर कोसांची तफावत आहे. अद्याप कांहीं तहरह नाहीं. पुढें काय होतें पहावें. घरचे कामास लांकडें तोडावयाविशीं र। विसाजीपंत लेले यांची सनद घेऊन मागें पाठविली ती पावलीच असेल. लांकडें घराच्या बेगमीचींच तोडावीं. देवालयाचे कामापैकीं शिल्लक राहिलीं असेल तीं खर्च करून जीं लागतील तितकींच तोडून खर्च करणें. लांकडें राहिल्यानें उपयोग पडणार नाहीं. याकरितां लिा आहे. घराचें काम आटोपल्यावर चांगलें. बळकट, मजुबूत भिंती चांगल्या घालून आटोपशीर करावें. पैका विशेष खर्च न करणें. रिकामा कारभार न वाढवणें. चैत्र मासांत घर तयार करून शंकराजी केशव यांस पुण्यास पाठवून देणे. येथून शिवराम महादेव यांसी निरोप द्यावा लागतो. याकरितां घराचें काम आटोपून घेऊन शंकरोबास पाठविणें. वरकड इकडील सविस्तर वर्तमान वेदमूर्ती पद्माकर पाध्ये सांगतां कळों येईल. आजिता काम कोठवर आलें ते लिहिलें पाहिजे. श्री सिद्धेश्वर व श्री मुगादेवीचे काम सांगितल्याप्रमाणें तयार केलें असेल. राहिलें असेल तें सांगितल्याप्रमाणें तयार करणें. काम जलदीनें करावें. फार दिवस न लावणें. बहुन काय लिहिणें ? कृपा किजे, हे विनंति आडिवरेकर त्रिवर्ग भटजी यांचे घरीं नमस्कार सांगणें.