Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५५.
श्री.
१६९० पौष शु। १
वेदमूर्ति राजश्री गणेशभट हरडीकर स्वामींचे सेवेसीः-
विद्यार्थी विठ्ठल कृष्ण सां नमस्कार विनंति उषरी येथील कुशल तारा पौष शुद्ध १ जाणून स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष. सरकारची सनद सायली लाकडाची राजश्री महादजी रघुनाथ. सुभेदार यांस पेशजीं घेऊन वेदमूर्ति महादेव पाध्ये नाटेकर यांजबराबर पाठविलीच आहे. व सुभेदारांनीं सरसुभांच्या सनदेचा आक्षेप केला ह्मणून लिहिलें होतें. त्यावरोन राजश्री विसाजीपंत सर सुभेदार यांचें पत्र घेऊन पाठविलें आहे. या उपरी लांकडें तोडून देवालयाचें व घराचें काम सत्वर सिद्धीस न्यावें. लांकडें तोडावयास तो तुह्मीं राजश्रीं शंकराजी केशव यांस पाठविलें आहे. लांकडें तोडलीं असतील. सरसुभांची सनद विजयदुर्गास पाठऊन, तेथील पत्र आणून, याउपरी लांकडें जलदीनें आणवणें. आणि घराचें काम निकडीनें करून, देवळाचें काम सांगितलें आहे त्याप्रमाणें त्वरेनें करून घेणें, घराचें काम फार न वाढवणें. आटोपतें धरून वैशाख मासाकारणें शाकारून टाकणें. कौलें करून अगोदर ठेवणें. जें साहित्य लागेल तें अजिपासून लगटानें काम करून घेणें. रिकामा फैलाव कराल तरी पैसा मिळणार नाहीं. लांकडे सनदेप्रों आणावयाची आहेत. जितकीं लागतीलशीं असतील तितकीं लागलींच आणून ठेवणें. लांकडे पैका खर्चून आणाल आणि राहतील तीं व्यर्थ जातील ऐसें न करणें, अथवा पाहिजेत तीं पुरीं न आणलीं आणि मग तीं आणावयास गेलो तेव्हां त्यांणीं अडथळा केला. मांगतीं सभाचे किल्याचें अथवा सरकारचें पत्र मागूं लागले तरी पुनः वारंवार खटपट होणार नाहीं. यास्तव, सूचनार्थ तपशीलवार लि।। आहे. पाहिजेत तीं आणून काम शेवटास नेणें, वैशाखा पुढें काम न ठेवणें. ऐवजाविषीं लि।। त्यास तूर्त ऐवजाची वोढी आहे. तुह्मांपाशील ऐवज खर्च करणें. मग पाठऊं. खर्च वावगा न करणें. श्रीमंतांसी भोसलियांसी बिघाड जाला आहे. यास्तव वराडप्रांते श्रीमंत फौज सुद्धां गेले. कळावें. बहुत काय लिहिणें ? लोभ असो दिजे हे विनंति, राजश्री शंकराजी पंतास नमस्कार सांगितल्या प्रों करावें. वाढऊ नये. हे विनंति.