Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६०.
श्रीगजानन.
१६९१ चैत्र.
पुा तीर्थरूपांचे सेवेसीः-
शिरसां नमस्कार विज्ञापना. आह्मीं वडिलांचे आशीर्वादें चिरंजीव सुद्धा घोडींपिडीं निभाऊन आलों ! कळलें पाहिजे. बुणग्यांत लिंगभट होता. सिवरें व सभरा घोड्या बुनग्यांत होत्या. महतापघोडी व खोसरी दोन्ही सभर आहेत. परंतु कौलीरान आहे. याजकरितां वैरणीची फार ताकीद. वैरण मिळत नाहीं. सालवण लागलें आहे. याजमुळें लोकांच्या घोड्या फार गांजलिडतात. परंतु आपले आशीर्वादें करून सर्व ईश्वर निभाऊन आणील. कळलें पाहिजे. प्रस्तुत देशीं गडबड नाहीं. जें होणें तें ह्याच प्रमाणें होईल. वडिलीं काळजी न करावी. आपणाकडील साकल्य लेहून पाठविले पो. अद्यापि मोगलसुधासारेच एकत्र आहेत. सल्ला होतो अगर काय होईल तें मागाहून लेहून सेवेसीं पाठवितों. यंदा निष्ठुरपणा काय निमित्य ह्मणोन पुण्याहून वडिलांचीं पत्रें एक दोन आलीं ! त्यास ये सालीं स्वारींत आनंद ! ता चाकरी पडिली ती. लिहितां पुरवत नाहीं ! आणि निदानीं भोंसल्यामागें सडी स्वारी सवा मेहिना पडली. त्याणें पाणपतास राहा म्हणविलें ! यलगंधचे झाडींत पंधरा रोज सूर्यदर्शन नाहीं, दाणावैरण नाहीं ! प्राणाशीं गांठी पडल्या ! फार लोक बुडाले. परंतु वडिलांचे आशीर्वादें चिरंजीव सुद्धां क्षेमरूप आला. आपल्या कडील पुणें व वाई व किल्ले व राजकी वृत्त ती लिहिलें प्रो श्रीमंतांसमागमें चाकरी निमित्य नाहीं, यास्तव आपलें पत्र पावोन आमचेंहि उत्तर न गेलें, वरकड वडिलांचे पायाशिवाय आह्मांस जोड काय आहे ? रात्रीदिवस लक्ष वडिलांचे चरणाशी आहे. ईश्वर साक्ष. पौष वद्य ३ पत्र वडिलीं पों तें आजी पावले. सविस्तर कळलें. मौजे चातुस व बोरीचा वसूल बेमुरवत करवावा. सदाशिव नारायण यासीं आणून वसूल घेतला पो. सदैव आशीर्वादपत्र पाठवावें. लोभ असावा. हे विज्ञापना, ती। सौ।। संपन्न वज्रचुडेमंडित मातुश्री वहिनीबाई व उमाबाईस शिरसाष्टांग नमस्कार, चिरंजीव रा तात्या व बाळाजी हरी व अंताजीपंत यांसी आशीर्वाद. लोभ करावा. हे आशीर्वाद. इ. इ.