Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५४.
श्री (नक्कल.)
१६९० मार्गशीर्ष वद्य ५
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री महिपतराव विश्वनाथ गोसावी यांसीं:--
सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार. सुा तिसा सितैन मया व अलफ. बाजीरुद्र पेशजीं सनसमान खमसेनांत कडप्याचे लढाईंत सरकारकामास आले. सबब तीर्थरुप कैलासवासी नानासाहेब यांणीं तीनसें रुपयांचा गांव इनाम द्यावयाचा करार केला. परंतु गांवची नेमणूक होऊन आली नाहीं. याजकरितां तीर्थरुप यांणीं तीनसें रुपयांचे तनख्याचा इनाम द्यावयाचा यादीवर करार केला होता तो पाहून त्यांचे बंधु राजश्री आपाजी रुद्र व बाळाजी रुद्र यांसी मौजे आघलगांव ता बेलहे प्रा जुन्नर येथील जाहीगीर व फौजदारी तुह्मांकडून दूर करून दोन्ही अंमल दरोबस्त इनाम करार करून देऊन भोगवटीयांस पत्रें करून दिल्हीं आहेत. त्याप्रों हरदू अंमल यांजकडे इनाम सुरळीत चालविणें, जाणिजे. छ १८ शाबान. बहुत काय लिहिणे?