Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६१
श्री.
१६९१ चैत्र शुद्ध १० मंदवार
पु॥ वेदमूर्ती राजश्री गणेश भट हरडीकर स्वामीचे सेवेसीः-
विनंती उपरी श्रीमंतांचे लष्करचा मुक्काम वंजिरा ( वाइनगंगा ) तीर येथें आहे. तेथून फाल्गुन शुद्ध ११ चीं पत्रें आलीं. त्यांत मजकूर कीं भोंसले चांद्यांस गेले, सड्या फौजा पाठीवर होत्या. त्यांस तफावत फार पडली. याकरितां श्रीमंतांनीं बोलाऊन आणिल्या. बुनगें मनरथा जवळ ठेविलें होतें. तेंहि वेजिरा संगमीं बोलावून नेलें, तोफखाना उंबरखेडावर होता. तोहि आणविला. सारे सरदार, फाजा एक जागां आल्या. या उपरी मनसबा करून, चांद्यास जाऊन, मोचें लावावे, ऐसा प्रकार आहे. देवाजीपंत, भोसले याकडील दिवाण, श्रीमंतांचे लष्करांत आहेत. त्यांनी सांडणी मोंसल्याकडे पाठविली आहे. सल्याचा प्रकार घडोन आला तरी उत्तम; नाहीं तरी पुढे चांद्यास जावें; ऐसें आहे. याप्रों वर्तमान लिहिलें आलें. पुढें येईल तें लिहून पाठऊं. पिराजी नाईक निंबाळकर बुनगियांत होते. ते पळून भोसल्याकडे गेले. श्रीमंत फौजेसुद्धा एकवेळ चांद्यापावेतों जाऊन, भो निर्मळकडे आले. पुणियास येणार असें जालें, तेव्हां माघारे फिरून पाठीस सडे होऊन लागले. ते बालेघाटास आल, भोंसले भालकीहून बेदराहून मागती झाडींत शिरोन, झाडीच्या वाटेनें चांद्यास गेले. तेव्हां श्रीमंतही भागानगरापासून मेदकाहून माघारे फिरोन प्रस्तुत गंगातीरास आले. दोन्ही फौजा धांवतां थकल्या ! तीन महिने याप्रो झालें. अद्यापि प्रथम दिवस आहे ! मुलकाचा आईत भारी जाला आहे. रुकनत दौले, जाधवराऊ देखील समागमें आहेत. चिरंजीव विसाजीपंत व रामचंद्रपंत, गोपाळराऊ, रास्ते, ऐसे सडी फौज पंचवीस हजार भो मागें होती, त्याचे मागें श्रीमंत होते. थोरले बुणगें पाथरीकडे पा होतें. चिरंजीव बळवंतराऊ श्रीमंताबराबर आहेत. फार हैराण प्रथम जाले. तुह्मीं श्रीस प्रार्थना करून उभयतांचे संरक्षाविशीं आंगारी टाकवणे. लोभ कीजे हे विनंति. ++