Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५९२
श्री ( नकल. )
१७२४ श्रावण शुध १३.
राजश्री केसो गंगाधर साठे गोसावी यांसीः-
सु। सलास मयातैन व अलफ. राजश्री येशवंतराव होळकर याची नजर सरकारावर वांकडी दिसोन, मान्येपठाण वगैरे फौजा जांबगांव पावेतों आल्या. सरकारांतूनही होळकर यांचे मनांतील वांकडेपणा समजोन फौजा तोंडावर पाठवावयाची तजवीज करून, पुरंधरे व पानसे बाहेर काहाडले. दहापंधरा हजार फौज व पांचसात हजार माणूस पायचें जमा करून, मानेपठाण यांस तंबी पोंचावी हा विचार केला आहे. पांडवगडचे मसलती......ध गेला आहां तर जेथपर्यंत जवळ......(फौजे) निशीं देखत चिठी गारदवंड येथें जाणें आणि लिहून पाठवणें. या कामास हुजुरून रा। बापू विठ्ठल व हुजरे आ॥ २ पो। आहेत. तरी विलंब न करणें. आरब माणूस शिपाईगिरीस चांगलें. होळकराची फौजकही, तेथें, योजना तशांचीच जाहली पाहिजे. तरी, लौकर जाणें, पांडवगडचा शह सुटल्यास चिंता नाही. किल्याचा कद फारसा नाहीं. या वेंकटराव दंवडेस पोंचोन, रा। बाळाजी रामचंद्र व लक्ष्मण महादेव व खंडो धोंडदेव यांजपाशी हजीरी देऊन, याचे गणतीचें पत्र हुजुर पाठऊन देणें. जाणिजे.
छ, ११ रा। खर.