Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५८९*
श्री.
१७२४ श्रावण वद्य मध्य ७।८
यादी. रामचंद्र दीक्षित व लक्ष्मीनारायण दीक्षित कायगांवकर. सुा। सल्लास मयातैन व अलफ, उर्फ श्रावण वा। ५ समीरखान पठाण निा रा। येशवंतराव होळकर याची फौजसुद्धां मुा। मौजे कायगांवीं आला. तेव्हां गांवांत त्यांणीं दंगा केला. त्याचे पुरवी एक दिवस आह्मीं फौजेचे भयामुळें मुलेंमाणसेंसुद्धां गांवातून निघोन सातारियास गेलों. तेथें राहन्याचा धीर पुरवेणा, ह्मणोन औरंगाबादेस आपल्या वाड्यांत मुलेंमाणसेंसुधां जाऊन राहिलों आणि सुभ्याची भेट घेऊन त्यास वर्तमान सांगितलें. त्यांणीं बहुतप्रकारें आमची खातरजमा केली, तुह्मांस कोणतेहि गोष्टीची तोशीस लागणार नाहीं, तुह्मीं आपले घरांत स्वस्त राहाणें. त्याजवरून आह्मीं घरांत स्वस्त राहिलों. इकडे कायगांवीं पठाणांनी उपद्रव करून, गरीबगुरीब ब्राह्मण गांवामध्ये सांपडे त्यास धरून, बहुत मारहाण केली. त्यांत च्यार ब्राह्मण मेले. गावच्या
-------------------------------------
* ह्या पत्रांतील खोडाखोडीवरून हें पत्र मसुदा म्हणून लिहिलेलें असावें पुष्कळ ठिकाणीं खोडलेलें असून आजूबाजूनेंहि शोध घातले असल्यामुळें ह्या पत्रास वैश्वदेवांतील बलिहरणाची उपमा देण्यास हरकत वाटत नाही. वर पत्रांत ज्या शब्दांवर आंकडे घातले आहेत त्या शब्दांपुढें जे शब्द खोडलेले आहेत ते पुढे दिले आहेत ?. पठाणांनी गांवांत दंगा केला. त्यास. २. बहुत उपद्रव केला. गांवांतील घरें उघडून चीजबस्त उकरून नेऊन घरांस ब्राह्मणांस व आमच्या मातुश्रीस धरून लशकरांत नेऊर गांवचे मुकामीं घेऊन गेले. गावची खंडणी पस्तीसहजार रुपये करून व गांवकरी मिळून वसूल देऊ लागले. कांहीं वसूल दिल्हा. बाकी दाहाहजार रुपये राहिले. तेव्हां गांवकरी दोन ब्राह्मण पठाणाकडील दोन प्यादे घेऊन, औरंगाबादेस आम्हांकडे आले. आमची त्यांची गांठ पडली, ब्राह्मण आम्हांस म्हणूं लागले कीं, दाहा हजार रुपये पठाणाचे देणें राहिले आहेत त्यांची तजवीज जाली पाहिजे. आमचे वाडे उभयतांचे लुटले. नंतर मातुश्रीस लष्करांत घेऊन गेले. नंतर पठाण यांणी विच्यार करून त्यांची घरेंहि खानलीं आणि मातोश्रीस आणावयाचें प्रयोजन काय, हें समजून मातुश्रीस सोडून दिल्हें. नंतर आपण कूच करून गेला. मातुश्री गंगेचे कांठीं येऊन बसली. तेव्हां सुर्तवाले याचा वकील पठाणाचे लष्करांत होता. तोहि तेथें आला. मातुश्रीची त्याची वाटेस नेउरगांवीं गांठ पडली. तेव्हां मातुश्री कायगांवास घेऊन आला. मातुश्रीची व सुरतवाल्याकडील वकिलाची नेवरगांवीं गांठ पडली. तेथें वकीलयाणीं तसदी केली कीं, तुम्हांस एकवीस हजार रुपये करार करून सोडविलें असें. तेव्हां मातुश्री बोलिले जे, सोडावयाचें कारण नव्हतें, पठाण समागमें नेते तरी जातें ! तेव्हां तसदी करून मातुश्रीपासून वाटेमध्ये रोखा रु। साडेएकवीस हजारांचा लिहून घेऊन कायगांवास घेऊन आला. तेथेंहि पैक्याकरितां तसदी केली. पैसा निघणा, सा। दुसरे दिवशीं शहरास घेऊन जाऊन परभारे पंधरा दिवस अटखात्या लावल्या-कांहीं. ३. हें वर्तमान शहरास आलें. बायकामुलें सुद्धां. ४. आणि गांवची खंडणी पस्तीस हजार रु। केली.त्याचा वसूलहि त्यांणीं बहुतकरून घेतला. हजार दोन हजार रुपये बाकी राहिली त्याजवरून आमचे वाडे उभयतांचे लुटले आणि मातुश्रीस लष्करांत घेऊन गेले. ५. तेथेंहि तसदी मातुश्रीस रु। विशीं केली. त्यांनीं उत्तर केलें कीं, मजपाशीं रु। नाहीं. तेव्हां दुसरे दिवशीं मातुश्रीस घेऊन आवरंगाबादेस आला, आणि कोठ-यांत कैद करून ठेविली. हें वर्तमान आम्हांस समजल्यानंतर आह्मी छेपून राहिलों. सुभ्याकडे जाऊन बोलणें बोलावें, त्यास आम्हांसहि कैद करतील हें मनांत आणून त्यांजकडे गेलों नाहीं. तेव्हां तीवारांनीं त्यांनीं मातुश्रीस सोडून घरास आणून घातल्या त्या संधींत सुभ्यानें पठाणाचें नांव करून सातारियांत वाडे तीन होते ते लुटून गाड्या भरून शहरास आणिल्या. या प्रों। वर्तमान असे. हे सर्व ध्यानास आणून आम्हांपासून व मातुश्रीपासून रोखे लिहून घेतले आहेत व सातारे येथील वाड्यांतील चीजवस्त नेली आहे ती माघारी देवावी व सातारियास हरएक विशीं उपद्रव होतो तो होऊं नये असें जाहलें पाहिजे. ( शेवटच्या टिपेंतील मजकूर खोडलेला नाहीं. एका बाजूस अलग लिहिला आहे. )
-----------------------
केंत ठेविलें, आम्हांस आश्रय कोणाचाच नाहीं. ज्याचा आश्रय केला तोच आम्हांस मारता ! असें समजलें म्हणून तेथून निघोन धण्याच्या पायांजवळ आलों. पठाणाचे प्याद्यां समवेत बसलों आहों, तों इतकियांत सुरतवाले याजकडील पन्नास माणूस येऊन आम्हांवर दगा केला. आम्हीं तोंड चुकविले. तेव्हां घरांतील बायका नेऊन लष्करांतील बाजारांत बसविल्या. तेव्हां आम्हीं गुलामहुसेन, सुभ्याकडील कारभारी, याजकडे गेलों आणि मजकूर सांगितला. आम्हांस म्हणूं लागला कीं, तुम्हीं सरकारांत पांच हजार रुा देणें व हजार रु। आम्हांस अंतस्थ देणें, एकूण सा हजार रुा देणें, म्हणजे तुमची मुलेंलेंकरें व चीजवस्त जी गेली असेल ती आणून देतों. त्याजवरून आम्हीं कबूल करून सा हजारांची चिठी बशर्त मुलेंलेंकरें व चीजवस्त आणून दिल्हा तर आम्हीं देऊं, म्हणोन लिहून दिल्ही. नंतर बायका बसल्या होत्या त्या सुटोन घरास आल्या. पठाणाचे दोन प्यादे आले होते. त्यांणीं दोघां ब्राह्मणास घेऊन कायगांवीं गेले, च्यार ब्राह्मण व आमची मातुश्री यांस आणि आमचे दोनी वाडे लुटून खणून चीजवस्त घरांतील घेऊन गेले.