मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ५८४

श्री.
१७२४ आषाढ कृष्ण ४

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री यशवंतराव याप्रति-

लक्ष्मीनारायण दीक्षित अनेक आशीर्वाद उपरी येथील क्षेम ता आषाढ कृष्ण चतुर्थी रविवार पावेतों कायगांवीं यथास्थित असे विशेष. बहुत दिवस तुह्मांकडून पत्र येऊन कुशल मजकूर समजत नाहीं. तेणेंकरून चित्त सापेक्षित आहे. तरी असें नसावें. सदैव पत्रद्वारें कुशलवृत्तलेखन करून तोषवीत असावें. यानंतर आह्मांकडील वर्तमान तों, या प्रांतीं फौजा आहेत. त्यांचें वर्तमान परस्परें कळेतच असेल. फत्तेसिंग माने यांनी तिरस्थळीवर हा काळ पावेतों कृपा केली आहे. पुढील न कळे ! मरिखां पठाण दाहा हजार हिंदुस्थानी, शिवाय पेंढार ऐशा जमावानिशीं वारीसिंगवे येथून वीस कोशांवर आहे. गंगा उतरावयास टोंक्यास येणार ऐसी वंदता आहे. त्याजवरून महद्धोर उत्पन्न झाला. श्री लज्या रक्षील ते खरी. असो. परस्परें सदैव पत्रद्वारें कुशलवृत्त कळवीत जावें. आह्मांस मंडूराची जरूर आहे. त्यास, दोन तोळे मंडूर कोणी सोईचा येईल त्याज बरोबर पाठवावा. बहुत काय लिहिणें ? लोभ करावा. +++++ हे आशिर्वाद.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries