Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ५०

पो आषाढ शुा ६ सोमवार
श्रीशंकर १६९० आषाढ शुा ५

वेदशास्त्रसंपन्न राजश्री बाळकृष्ण दीक्षित स्वामीचे सेवेसी:-

विद्यार्थी कृष्णराव बल्लाळ सां नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता छ ३ सफर मुा माडवे येथें आपले कृपेंकरून सुखरूप असों. विशेष. कृपा करून पत्र पाठविलें तें पावलें. इकडील वर्तमानः श्रीमंत राजश्री पंत प्रधान यांच्या व श्रीमंत राजश्री दादासाहेबांच्या भेटी जाहल्या. मजल दर मजल पुणियास जात आहेत. दादासाहेबांनीं त्रिंबक व धोडप वगैरे किल्ले होते त्यांच्या चिट्या दिल्या. किल्ले हस्तगत व्हावयाकरितां रा रामचंद्र गणेश व रा विसाजी कृष्ण उभयतां दोन हजार फौज घेऊन मदनेस्वरचें नांदूर येथें राहिले आहेत. किल्ले हस्तगत होऊन लवकरच पुणियास येतील. श्रीमंतांस पत्र पा होतें. त्याचें उत्तर पाठविलें आहे- ऐवज पोहोंचेल. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दिजे. हे विनंति.