Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ४९

श्री.
पा जेष्ठ वद्य ३० मंगळवार.
१६९० ज्येष्ठ वद्य १३

वेदशास्त्रसंपन्न राजश्री कृष्णराव दिक्षित स्वामचे शेवेसीः-

विद्यार्थी बाळकृष्ण बल्लाळ मा नमस्कार विनंति उपरी येथील वर्तमान ता छ २६ मोहरम मुा धोडप सुखरूप असों. विशेष. छ. २४ मीनहूस श्रीमंतांची फौज मुक्काम मजकुरीं तयार होऊन उभी होती. तों राजश्री गोपाळराव गोविंद यांची फौज पुढें आली होती. गांठ पडोन फौज मोडोन पलोन गेली. श्रीमंताचे हत्ती अकरा व सदाशीव रामचंद्र यांचे हत्ती च्यार व अवधूतराव केशव याचा हत्ती एक वगैरे किरकोळ मिळोन, अठरा वास हत्ती व तमाम तोफखाना पाडाव करून घेतला. पांच सातशें उंट, च्यार पांचशें घोडीं, डेरे, दांडे कुल लुटून गेले. श्रीमंत दादासाहेब धोडपचे माचीस गेले. चिंतो विठ्ठल जखम होऊन पाडाव आला. त्यांचा भाऊ मोरो विठ्ठल ठार जाहला. आज छ २६ मीनहूस किल्याभोंवत्या फौजा उतरल्या आहेत. तो सरंजाम माफकच आहे. पहावें, आपणास कळावें ह्मणोन लिहिले आहे. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दिजे. हे विनंति.