Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५४३
श्री.
१७२३ कार्तिक शुद्ध ७
राजश्रियाविराजित राजमान्यराजश्री गंगाधरपंत यांप्रति रामचंद्र दीक्षित आशिर्वाद उपरी येथील क्षेम तार कार्तिक शुद्ध ७ रविवार पावेतों यथास्थित असों. विशेष. अलीकडे तुमचें वर्तमान पत्र येऊन कळत नाहीं व लष्करचें बातमीचें वर्तमान कळत नाहीं. इकडे लष्करचें वर्तमान कीं, मीरखान पठाण व गोपाळराव व श्रीपतराव व पेंढार ऐंसें ब-हाणपुरीं येऊन दाखल जालें, ते इकडे येतात, ह्मणोन श्रीमंतांचे डांकेचे वर्तमान गांडापुरीं व प्रवरासंगमी शनवारीं आलें, येणें कडून चित्त चिंताक्रांत आहे. मिरखानाचे फौजेची दहशत भारी आहे. याजकरितां तिरस्थळी घाबरली आहे. त्यास, * शहरीं फौजेचें पक्कें वर्तमान असेल ते लिहून पाठवावें. शहरी पक्कीं बातमी नसल्यास शेंदुरणीस मुजरहू बोसमी करितां अजुरदार पाठऊन, पक्की बातमी आणवून, कोणीकडे जाते हें सविस्तर बातमी आणवून लिहून पाठविणें, अथवा शहरीं वर्तमान पक्कें असलियास, तुमचें उत्तर लवकर पाठवावें. म्हणजे तुमचे लिहिल्यावरून मुलामाणसांची शहरीं यावयाची तजवीज करूं हे आशीर्वाद.