Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४४७
श्री लक्ष्मीकांत. १७१८ फाल्गुन वद्य ३०
राजश्री बाळाजीपंत नाना गोसावी यांसीः--
दंडवत विनंती उपरी. आपण चिठी पाठविली ती पावोन लिहिला मजकूर कळों आला. राजश्री बाजीराव यांचा निरोप घेऊन सातारियास आलों. येविशींचा मजकूर राजश्री श्रीधर लक्ष्मण व कृष्णराव माधव लिहितील. प्रस्तुत कित्तेक गोष्टी अडचणीच्या दिसतात. परंतु ईश्वरकृपेनें उलगडतील. आपली दृष्ट इकडे असावी म्हणोन लिहिलें. आपलें जाणें सातारियास जालें, तेव्हां रावमशारनिलेनीं बहुतां प्रकारें खातरजमा करून निरोप दिल्हा. आपणहि बंदोबस्तानसीं आहेत, म्हणोन उभयतांचे लिहिल्यावरून कळों आलें. ऐशियास, आपले * दूरंदेशीनें लोभ संपादून साता-यास जाणें घडविलें. येनेंकडून मसलतीचे बहुत उपयोग आहेत. इकडे द्रीष्ट असावी. याजविसींचा प्रकार पूर्वीचा रुनानुबंध आहे, तेव्हां ल्याहावें ऐसें नाहीं. पूर्वी आपल्या इशा-या प्रों घडलें व पुढेंहि तैसेंच घडेल. याजविसींचा मजकूर पूर्वीपासून उभयतां आपल्यापाशीं बोलतच आहेत. व आतांही बोलतील. हिंमत बाहाळ असावी. येनेंकडून श्रीकृपेनीं सर्व उत्तमच घडेल. गा छ २८ माहे रमजान, बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंती. मोर्तबसुद.