Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ४५१

श्री. १७१८

हाजी अबदुल नि।। वलीआहदबहादूर हुजूर आहे, याविसीची आंदेशा लिहिला. तर, शानिजामदीन याची रीत तुह्मास वाकफ जालीच आहे. येशवंतराव सिंदेयाचा प्रकार समजलाच आहे. त्यापक्षीं येथून हाजी-आबदुल-मजीद व सरकारचे तर्फेचा मातबर कारकून नेमून दिल्हा आहे. ते उभयतां हुजूर पातशाहाचे खर्चाचे माहाल वगैरेचा बंदोबस्त राखून रजावंदी राखितील. तुह्मी त्याचा उपर राखणें. इसमाल–बेग या (स) ग्वालेरीस आणावयाचें केलें. उत्तम केलें. परंतु पलटणचौकीबरोबर बंदोबस्त पका राखून पोहचावणें ठीक असें. नबाब, वजीर व पामरसाहेब वगैरे पत्रें आणिविलीं. तूर्त पामरसाहेबास लि।। आहे. तुह्मीं मनन करून, पत्र त्यास पोहचाऊन देणें, त्याचें उतर ते लिहितील व तुह्मासी बोलतील ते सविस्तर लि।।. नबाबवजीर यास आलाहिदा लिहून विशेष आहे ऐसें नाहीं. हें तुह्मीहि जाणत नसाल ऐसें नाहीं. जो सालजाब होणें तो पामरसाहेबाच्याच विद्यमानें होईल. तुह्मी लि।। होतें कीं, च्यार पाच किल्ले कृष्णगडसुद्धां आहेत. नेमणूक हे लक्ष्मण अनंत यांणी कमी केली होती, त्याप्रमाणें असावी ह्मणोन लि।। होतें. तर, तें ठीक नाहीं. पेशजीची नेमणूक आहे तेच बाहाल करून बंदोबस्त राखवणें. बेदील ठाणेयाच्या लोकास न करणें. कृष्णगडास कृष्णाजी आंबादास याजकडील कारकून पोहचलेच असतील. तुह्मापासीहि पावलेच असतील. तर, जलद त्याची दिलभरी करून, रवाना करून देणें. ह्मणजे खातरजमेनें बंदोबस्त राखतील. दिल्लीचे नजीक, आणि जागा मेवातची. यास्तव बरगुजर न करणें, लौकर काम उ ( ल ) गडून देणें.