Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ४४४

श्री १७१८ फाल्गुन वद्य ५


सरकारचें पत्र राजश्री जगन्नाथराम यासी जेः पेशजी इकडे कारभारी कैद केले. त्या आवईमुळें राजश्री लक्ष्मण अनंत फौजेंतून निघून ब्रह्मवर्ती गेले. त्यास, त्याजकडे सरकारचा पैसा कांहींच नाहीं. हाली सरकारांतून त्याची खातरजमा करून आणविले आहेत. त्यांस, पहिलेप्रमाणें कामकाज तुह्मी ते मिळोन करित होतां, त्याप्रो ते लस्करांत आले ह्मणजे करीत जावें. सरकारचीं पत्रें त्यांस पोहचलीं, म्हणजे मा।र्निले लस्करांत यावयाचा उद्योग करतीलच. त्यांस, पुढें तुह्मी जाऊन घेऊन यावें. आग-याचा किला त्याजकडे पाहिला होता. त्याचा बंदोबस्त त्याचा ते राखतील, सरकारांत त्याजविसीची खातरजमा आहे. तेथील हिंदुस्थानचा बंदोबस्त पूर्ववतप्रमाणें तुह्मी व त्यांणीं मिळोन करित जावा. ते लस्करांत आल्यावर आग-याच्या सनदा त्यांचे नांवें पाठवितों. तवपर्यंत किल्याची घालमेल तुह्मी न करावी. ते आल्यावर बंदोबस्त करतील, म्हणोन पत्र.

परवानगी समक्ष कृष्णाजी व धोंडीबा जामदार. छ १७ रमजान, सन सवा.