Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २१

॥ श्री ।।
१६८६ श्रावण शुद्ध ३

वेदशास्त्रसंपन्न राजश्री सदाशिव-दिक्षित स्वामीचे सेवेसी:-

विद्यार्थी माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष. शहरास जावयाकरितां निजामअल्लीखान गंगा राक्षसभुवनांनजीक उतरुं लागले. कांहीं फौज व बाहिरबुणगे पलीकडे गेले. नावपिना व सरदार व विठ्ठलदास दाहापंधरा हजार फौजेनिशिं इकडे होते. त्याचें पारिपत्यास जाऊन, छ २९ मोहरमीं गाठ घातली. मातबर लढाई झाली. विठ्ठलदास व विनायक दास, गोपाळसिंग खंदारकर वगैरे ठार जाले. मुरादखान व रघुपतराव पिंगळे, मालोजि घोरपडे, बाबूराव जंगी वगैरे पाडाव जाले. त्यास, माणूस पाचसास हजार रणास आले. श्रीकृपेनें मोठी फत्ते जाली. तोफा, हत्ती सापडले. निजाम अल्लीखान पडतीरास होते. ते मध्यें रात्री कूच करून, तोफा व डेरे टाकून, पळोन गेले. संतोषाचें वर्तमान तुह्यांस कळावें, याजकरितां लिहिलें असे. र॥ छ ३ सफर, * बहुत काय लिहिणे १ हे विनंती.