Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २२

श्री.
१६८६ कार्तिक शुा ५

अखांडतलक्ष्मीअलंकृतराजमान्य राजश्री रामचंद्र बसवंत गोसावी यांसीः-

सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार. सुा खंमस सितैन मया व अलफ. राजश्री दमाजी गायकवाड सेनाखासखेल-समशेरबहादर यांजवर राजश्री रामचंद्र महादेव परांजपे व मार्तंड नाईक तासके साहुकार यांस राजश्री मल्हारजी होळकर यांचे ऐंवजीं दोन लाख रुपयाची वरात रदकर्जाची पेशजीं दिल्ही आहे. त्यापो कृष्णाजी नाईक लाडू यांजवळ एक लाख रुपयांच्या मात्र वराता कमाविसदारांवर दिल्यात. बाकी लाख रुपये राहिले ते देत नाहीत. सरकारांत इजाफा ऐवज पावला आहे, म्हणोन नाईकमार्निले यांजवळ सांगितलें. त्याजवरून, इा सन सलास ता सन अर्बा दुसालां गाइकवाडाकडौल ऐवजाचे वसूलबाकीचा हिशेब अलाहिदा पाठविला आहे. त्या हिंसेबीं रु। ८७७६।- आठ हजार सातसें सवा शाहात्तर रु। आणा मात्र फाजील आहे. त्यास, सालाचे सालांत मुदतीप्रमाणें ऐवज यावा तो न आला. त्याचें व्याजहि होणें आहे. व सालमजकूरचा ऐवजहि येणें आहे. असें असोन, होळकराचे ऐवजास हिसका द्यावा, यास कारण काय ? हा ऐवज सालगुदस्तांच द्यावा, तो न दिला. होळकराकडील कारकून गंगाधर यशवंत याचे पुत्र व राऊजी माहादेव ऐसे तीर्थरुप राजश्री दादासाहेब यांजवळ आहेत. त्यास, दोन लाख रुपयांचा निर्गम झाल्याशिवाय निरोप होत नाहीं. सरकारांत ऐवजाची निकड. याजकरितां नाईक मारनिलेपासून ऐवज घेऊन वरात दिल्ही, त्यास ऐवज जरूर पावला पाहिजे, याजकरितां हें पत्र तुम्हांस सादर केलें असें. तरी पत्रदर्शनीं लाख रुपयांच्या पुण्याच्या हुंड्या नाईकमारनिलेस देऊन, पावल्याचें कबज घेऊन, हुजूर पाठवणें. फिरोन बोभाट हुजूर येऊं न देणें. जाणिजे, छ ३ जमादिलावल,*  *