Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २३
श्री.
१६८६ कार्तिक वद्य ६
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री रामचंद्र बसवंत स्वामी गोसावी यांसी-
पो माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. राजश्री दमाजी गायकवाड सेनाखासखेल समशेरबहादर याजकडे सरकारचा ऐवज येणें. त्याचे वसुलास हुजुरून राजश्री बाळाजी अनंत कारकून यांस पेशजीं पाठविलें होतें. त्याजबराबर गायकवाडाकडील ऐवजाचे वसूलबाकीचा झाडा पाठविला तो सरकारांत दाखल जाहाला. त्यांत सवा लाख रुपयांच्या हुंड्या राजश्री आबाजी नाईक कापरस व कृष्णाजी नाईक लाडू यांचे गुजारतीनें सरकारांत हुजूर भरणा जाला. ह्मणोन झाड्यांत वसुल घातले आहेत. त्यापैकीं परभारें वरातदारांस ऐवज पावला. वराता व कबजें येणें आहेत, रु। ५९२२५. बाकी ऐवज राहिला रुपये ६५७७५, पांसष्ट हजार सातशें पंचाहत्तर रुपये राहिले. हा ऐवज तुह्मांकडे खुद निसवत राहिला. त्यास, सरकारांत ऐवजाची निकड, हें पुर्ते तुह्मांस ठावळें असोन, गायकवाडापासोन ऐवज घेतला असतां, सरकारांत भरणा केला नाहीं, हें अपूर्व आहे ! असो ! हालीं हे पत्र तुह्मांस सादर केलें असे. तरी सदरहू पांसष्ट हजार सातशें पंचाहत्तर रुपये ज्या मित्तीने घेतले असतील, त्या मित्तीपासून व्याजसुद्धां ऐवजाच्या हुंड्या साहुकारी पुण्याच्या पत्रदर्शनीं राजश्री रामचंद्र माहादेव परांजपे व मार्तंड नाईक तासके यांस देऊन, पावल्याचें कबज घेऊन, हुजूर पाठवणें. फिरोन बोभाट येऊं न देणें. जाणिजे. छ ४ जमादिलावल, सु। खमस सितैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें? हे विनंती.