मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक १८६

श्री
१६९९ पौषवद्य ११

राजश्री महादजी शिंदे गोसावी यांसीः -

छ सकल गुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो माधवराव नारायण प्रधान आशीर्वाद उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. राजश्री महिपतराव कृष्ण साठे यांजकडे पो हुकेरी वे मनोळी
हे तालुके कर्जांत. त्यास सन सितांत एसाजी शिंदे फौजसुद्धां पो मजकुरी येऊन गांव घेतले. त्यांपैकी कांहीं गांव राजश्री रामचंद्र गणेश यांणीं घेऊन मारनिलेचे हवालीं केले. कांहीं गांव ठाणें, सेंदूर व हासूर वगैरे येणें राहिलें आहेत. त्यास तिकडे सांप्रत तुझी गेलां आहां, याजकरितां तुह्मीं यांजकडील गांव घेऊन मशारनिलेचे हवालीं करणें, मारनिलेचे कारकून तुह्माकडे गेलेच आहेत. ते तिकडील माहितगारी तुम्हांस सांगतील. त्याप्रमाणें जरब पोंचाऊन ठाणीं घेऊन हवालीं करणें. जाणिजे. छ २४ जिल्हेज, सुा समान सबैन मया व अलफ, बहुत काय लिहिणे ? हे आशीर्वाद. लेखन सीमा.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries