Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक १७२

श्री
१६९८ मार्गशीर्ष अखेर

आंशाहामत पन्हांनी किताबत वसूल उसूल केली ते पोहोंचोन खुष खुरमी हांसल जाहाली. व आशाहामतपन्हांकडून सदाकत अतवार नरसिंगराव आले. यांणीं मूंजबानी जाहीर केलें, ते मुफसल जाहीर जाहालें. वपारच्या रसीद जाली ते पोहचली. त्याजवरून गंगाधर राव रास्ते हुजूर येऊन आशाहामतपन्हांकडून मुक्दमा जाहीर केला, तो मालूम जाहाला. ऐसीयास, ये बाबेचा मजकूर नरसिंगराव यांस सांगितला आहे. हे लिहितील त्याजवरून कळेल. हमेशा किताबत पाठवून दिल ताजा करणें. दोस्ती जागां.