Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक १७७

१६९९ चैत्र शुद्ध १४
श्री ( अस्सल बरहुा नकल.)

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री हरी बल्लाळ स्वामी गोसावी यांसीः-

पो माधवराव नारायण प्रधान नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. पा सांगोलें व आलेबले व माचनूर व पुळुंज वगैरे गांव राजश्री विसाजी कृष्ण यांजकडे सरंजामास आहेत. त्यास, तुह्मीं त्यांचे गांवांवर रोखे करूद ऐवज घेतला, व पुढें रोखे होतच आहेत, ह्मणोन हुजूर विदित जालें. ऐशास, यांचे माहालास व गांवास उपसर्ग न करणें. रोखे केले असतील ते मना करवून, ऐवज घेतला असेल तो माघारा देणें, गांवगन्ना राऊत रखवालीस देऊन, त्यांचे महालास व गांवास उपसर्ग होऊं न देणें. जाणिजे. छ १२ रोबल, सुा सबा सबैन मया व अलफ, बहुत काय लिहिणे ? हे विनंति.