Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक १४७

श्री. ( नकले)
१६९६ श्रावण वद्य १०

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री नरसिंगराव जनार्दन धायगुडे यांसीं:-

सेवक माधवराव नारायण प्रधान नमस्कार सुा खमस सबैन मया व अलफ, तुह्मांकडील सरंजामाचे माहालांतून राजश्री मुधोजी भोंसले व हैदरे नाईक व गोविंदराव गायकवाड यांजकडे वगैरे फितुरी जागां शिलेदार वगैरे चाकरीस गेले असतील. त्यांची गांवगन्नावर चौकशी करून, घरें व वतनें ठि काणीं लाऊन, जप्त करणें. व त्यांचे माणसांकडून त्यांस कागद लिहून ते घरीं लवकर येत तें करणें. व आणखी शिलेदार तुमचे तालुक्यांत राहत असतील, त्यांणीं फितुरी सरदारांकडे चाकरीस जाऊं नये येविशी त्यांस गांवचे पाटील कुळकर्णी जामीन घेणें. ह्मणोन तुह्मीं आपले कमावीसदार यांस' माहालोमाहालीं पत्रें लिहून बंदोबस्त करणें. जाणिजे. छ २३ जमादिलाखर, बहुत काय लिहिणें ? लेखनसीमा.