Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[२१९]                                       ।। श्री ।।            २२ जुलै १७६०.

पुरवणी राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसः

विनंति उपरि. शाहाजादा, पटणें मजबूद जाफरअल्लीचा पुत्रहि जमावसुद्धां आला. त्यामुळे पटणें सोडून झाडींत गेला. त्यामागें मीरनहि गेला. त्याकडे काशीद गेले आहेत. वर्तमान आलिया लिहून पाठवितों. शाहाजाद्याकडे अबदालीचे, सुजाउदौलाचे, नजीबखानाचे, आणावयास वकील गेले आहेत. परंतु, त्याणें विचार केला कीं कोणी वजीर जाहालिया आपणास उपयोगीं नाहीं. यास्तव सध्यां कोठेंच न जावें. हा विचार करून त्यांस उत्तरें बाजतबरसात जें करणें तें करूं ह्मणून लिहून दिली. तो जात नाहीं ह्मणून लिहिलें तें कळलें. याउपरहि तिकडून बातमी उत्तम प्रकारें राखून लिहून पाठवीत जाणें. र॥ छ ९ जिल्हेज. हे विनंति.