मग असें कां झालें ? यांत काय झालें कीं आह्मी नादौलतखाही केली, असो, ज्यानीं दौलतवाही केली असेल ती त्यांणीं हजरतीस दाखवावी, आह्मी दैलतवाही केली न केली हें ईश्वरास ठाऊक आहे. तेव्हां मीरअल्लम ह्मणाले कीं कशाचा करार, कशाचा मदार, जर असें आहे तर खावंदास समजावणारांनीं कोणा तोंडानें समजाविलें, असो, आह्मांस कांहीं नवाबाची दिवणागिरी करावयाची नाहीं, कीं लटकें लांडें बोलून समजूत काढावी. एवढ्या. शब्दावर मीर अल्लम बोलले कीं, आपण दान दुरंदेष असें का मनांत येईल? याजवर एक गोष्ट उलटून बोललों की, नवाब आपले मदांत समजोत अथवा न समजोत, परंतु ज्यांत दाही दौलतीची बेहबूदत चांगलें, कोणी दिवाण होऊन या चालीनें चालल्यास उत्तम मार्ग, या चालीविरुद्ध चाल असल्यास आह्मी साफ अर्ज नवाबास करूं कीं, हा . दिवाण कामाचा नाहीं, याविषयीं मागें पुढें पाहणार नाहीं, दौलतीचे भेदबुद्धीची इच्छा असल्यास ऐकतील, नसल्यास न ऐकतील, होणार असेल त्यास कोण काय करितो? प्रस्तुतचा रंग तर असा दिमतो जे अला व अदना खावंदांपाशीं. बराबर, आणि ज्यास हौसक आहे तो, ज्यास हौसक नाहीं, आणि योग्यता नाहीं तो, उभय प्रकारचीं मनुष्यें सर्वांस असेंच वाटतें कीं, नवाबाची दिवाणी करावी, अशी बचबच झाली आहे. याप्रमाणें बोलल्यावर मीर अल्लम ह्मणाले; प्रस्तुतकालीं तर असेंच आहे. राजाजी ह्मणालें, पुढें व्हावें जालें. मीरअल्लम ह्मणाले कीं, व्हावयाचें काय ? हजरत कराराशिवाय गोष्टी बोलतात, त्या बोलूं नयेत याची खातरजमा करून द्यावी, हेही दौलतखाहीस कसूर करणार नाहींत, असें घडावें ह्मणजे झालें. याचें उत्तर मीं दिलें जे, याविषयीं हजरत सर्वं जाणतात, आह्मी आपलेकडे नादौलत खाहीचा शब्द घेऊन तुह्मांकडून रदबदल करवीत नाहीं, करारमदार इमान प्रमाणास , सचोटीस, . सरदारीस जे लाजम असेल तें करावें, जाहीरदारीचें प्रयोजन नाहीं, जशी मर्जी असेल तें स्पष्ट सांगावें हें चांगलें, तुह्मीं नोकर- आहा, तेव्हां खैर खाहीस काय पुसावयाचें? योग्य आणि लाजिम असेल तेंच करावें. याअन्वयें बोलणें होऊन उठलों. खिलवतेचे दिवाणखान्याबाहेर आलों. तेथून राजाजी आपले घरास गेले. थोरले दिवाणखान्याबाहेर देवडी आहे तेथपर्यंत मीरअलग व मी बरोबर बाहेर आलों. तेव्हां बोलिले कीं, दप्तरचे कामास आणि राजकारणाचे कामास बहुत अंतर आहे, मनुष्यांत गंभीरता असणें हें योग्यतेस कारण आहे. मीं ह्मटलें खरें आहे, हा तुका रेणूराव याज वर. नंतर ह्मणाले, त्यांची माझी गांठ पडून बोलणें झालें पाहिजे, याचा योग कसा? त्यास ह्मटलें, तुह्मी योजना करून सांगावें. उत्तम ह्मणून बोलले. त्यानंतर निरोप आला नाहीं. र।। छ २८ जिल्काद. हे विज्ञापना.