Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)

लेखांक २९०                                                                                 श्री 

मौजे सांगवी ता। सांडस प्राा पुणे येथील शेरी तांबे थल पौ। तिरोका बिघे ३० पेशजी चाकणचे अमदानीस चालत होती अमल लोहेखान ते वेलेस कुमाजी बिन दाजी पाटील केले मोकदम नहावीस होता गावात करभाजी लखमाजी बिन होनाजी कुमाजी मा।र याचा चुलता व पिलाजी बिन सावजी पाबले चौगुला व गोपाल कृष्ण गुमास्ते कुलकरणी त्या अमदानीस मालजी बिन सावजी पाबल याजकडे शेरीची सरकती होती शेरीचा माल पीक अमदानी देशमुखाचे घरी आणोन देत होता खंडणी करावयासी पाटील कुलकरणी चाकणास गेले खंडणी होऊन जामीन साकली होऊ लागली ते समई लखमाजी व पिलाजी पिंपलेकर पाटील यासी जामीन जामीन जाहाले की हे गेले पलाले तरी दीडशे हानासी निशा आपण करोन देऊ त्यासी तो गाव पलाला तेव्हा जामीनास तगादा केला स्वारासी बरदास्त करोन रात्रीस पलोन गेले नंतर स्वारांनी गावात वरकडाचे मुलामाणसास छेडछेड केली त्यासमई शेरीकराने स्वार समागमे घेऊन मोकदम पाटील नाहावीस होता त्यासी दाखविले तेथोन स्वारांनी पाटीलास चाकणस घेऊन जाऊन पायात बेडी घातली पिंपलेकर पाटील आणोन हाजीर करावा नाही तर दीडशे होनासी निशा करावी तेव्हा नाहावकर सितोले यांनी मालोजी नरसिंगराव बावा देशमुख याजपासी येऊन विनंति केली की तुमचा पाटील कैदेत पडला आहे यासी सुटका होय तो अर्थ केला पाहिजे त्याजवर देशमुखानी विचार करोन पाटलाची बायको व पुत्र उभयतास बरोबर संतु गुरव व धावनाक माहार समागमे देऊन चाकरणकर देशमुखास पत्र दिली जे उभयतास येऊन पाटलास सोडून द्यावे ह्मणजे ऐवजाची तरतूद करील त्याजवर पाटलास सोडून दिले घरास येऊन गावकरी बोलाऊन सर्वत्रानी मिलोन स्ये संभर दिले आणि पाटलान आपले घरचे घोड व वस्तभाव विकोन ऐवजाची भरती केली जामीनकी उगवोन सिरपाव घेऊन बायको व पुत्र याजला घेऊन गावास आला मग बरवाजी पाबला चौगुला रोनगावकीचा कारभार करू लागले ते समई पाटील मा।राने मालोजी बाबा देशमुख याजपासी सांगीतले की तुमचे शेसीकरान स्वार आणोन दाखऊन दिले ह्मणोन सांगीतले नंतर त्याजकडोन शेरी काहाडली जाखोजी पाबला याजकडे सेरीचे काम सांगीतले त्याजवर जाखोजीने काही दिवस शेरी व पुढे चाकणेकडोन गाव निघाला काल बहुत कठीण पडला गाव उज्याड जाहाला त्याजवर अवरंगजेब बाछा मुलकात आले त्याचा कौल घेतला परंतु गावात वस्ती जाहाली नाही