Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)

तेथील शह उठऊन माघारे आले ते समई सावर्डे माहालापासून लुटीत आले कसबा संगमेश्वर येथे वीस दिवस तळ दिल्हा कसबा लुटिला तेव्हापासून कसब्याचे लोक वराघाटे जाऊन बाहेर प्रातात जाऊन राहिले ते अद्यापी गावी आले नाहीत तेव्हापासून कसबा खराब पडिला माहाला दाहा वर्षे उज्याड होता त्याजवर श्रीमंत कैलासवासी श्रीपतराव प्रतिनिधीयाणी आमचे चुलत आजे विसोबा नायक याजला सातारेयासी बोलाऊन नेऊन माहाल भरावयाविसी कौल दिल्हा त्याजवरून माहाल भरिला आणि प्रचीतगडी मुलें माणसे होती ती कसब्यात आणून वाडा बांधोन राहिले माहालचा कारभार दाहा बारा वर्षे त्याणी केला पुढे माहाल श्रीमत कैलासवासी कान्होजी आंगरे सरखेलयाणी श्रीपतराव याजकडून इजारा करून घेतला असे दोहो वर्षांनी विसोबा नायक कसब्यात वारले त्याची स्त्री समागमे गेली. अंतोवा नायक होते तेहि एक वर्षानंतर विशालगडास गेले केशव नायक पुतण्ये वाड्यात ठेविले होते त्यास रत्‍नागिरी शेखोजी आंगरे याणी घेतली तेव्हा केशव नायक कुलाब्यास गेले तेथून येऊन रत्‍नागिरीस घर बांधोन राहिले कसब्यातील वाड्यात बिराडू ठेविले होते त्याचे हातून आग लागली किंवा कांबळ्या चाकर वाड्याचे उस्तवारीस ठेविला होता त्याचे हातून आग्न लागोन वाड जलाला ऐसी लोकांची बोली आहे त्यास अजमासे पनास वर्षा आलीकडे होतील वाडा जलाला परंतु वाड्यानजीक बाग व वाड्याचे इमारतीचे रखवालीस चाकर नेहेमी घरे बांधोन वाड्यापुढे आहेत व सिमग्याचा मान आमची वस्ती वाड्यात नाही तथापि चालत आहे येविसीचा करीना आलाहिदा राजश्री परशुरामपंत याजवल लेहून दिल्हा आहे त्यावरून सर्व अर्थ आपल्या ध्यानात येईल कसब्यातील वाडा आमचा येथे च वडीलाची वस्ती चाकर कुणबिणीची सभोवती वाड्यापुढे घरें आहेत कसब्यात नादणूक याजमुळे वाडा मातबर बाधिला आहे. कसब्याखेरीज खासगत वतनी गांव व सुभ्यास कारभारामुले जाणे पडे व कारभारी नेहमी राहात याजमुळे वाडे बांधिले आहेत ते हाली वाडे आहेत परंतु त्याची इमारत व आवार व बागेतील जुनी झाडे आहेत ते वाडे 

289