Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
पुढे शाहूमहाराजाचे अमदानीस दमाजी थोरात यांनी आपले सिलेदारास गाव मोकासे दिले त्या वेलस सांगवी गाव सितोजी सितोले यासी मोकासा करून दिला त्यानी तुकोजी पाटील याचा पुत्र वाकोजी पाटील खानदेशातून धरून आणिले आणि थोराताचा कौल देऊन गावची वस्ती केली तेव्हा आपली सेरी नाहावीकर होनाजी सितोले यासी लाविली होती त्याने सात आठ वरसे वयवाट केली फिरोन गाव उज्याड पडला मग पुढे बालाजीपंत नाना याचे कौलाने मागती वस्ती जाहाली मग वाकोजी पाटील आपले बापास घेऊन तलेगावास आला पुण्यास येऊन देशमुख देशपांडियासि भेटून वर्तमान सांगितले की मी एकला आहे भाऊबंद कुलडम असामी कोणी नाही यासी काय ते आज्ञा करावी त्यासी सांगीतल जे आसपास भाऊबंद व कुणबी आसामी अशेल त्यासी आणोन वस्ती करावी त्याजवर पाटलानी उतर केले की पोटास काय खावे त्यासी उतर केले की दोन पायली दाणे देतो घेऊन चहूकडे प्रयत्न करोन गावची वस्ती करावी पाटलाने जाऊन दोन चार भाऊ ठिकाणी लाऊन लखमाजी बिन देवजी कलो बरोबर घेऊन पुण्यास आला आणि कौल मागू लागला भेटी ऐवाजयासी अनकूल नाही बापोजी श्रीपत सुभेदार याजपुढे पानसुपारी ठेऊन कौल घेतला त्यावर थोडीसी वस्ती जाहाली सिवार पडला च होता पाच सात सेत मात्र लागली होती पुढे गावकी न चाले आणि सिवार हि न लागे ह्मणोन सितोजी बावा सितोले भाऊ करोन लावणी केली आणि वस्ती हि जाहाली पुढे पाचा साता वरसा पुण्यास येऊन श्रीमंत बाजीराव साहेबाचे कानावर घालोन सुरत महाजर अभयपत्र व देशमुख देशपांडे सरकार कारकूण हवालदार मजमदार गावास घेऊन गेले भोवर गावचे पाटील व बारा बलुते जमा करोन महजर करू लागले कागद सिधे जालाले ते समई देशमुख देशपांडे बोलले की आमची सेरी व इनाम दाखऊन द्यावी ह्मणजे लावणी करू मग वाकोजी पाटील व गोदाजी पाटील व सितोले बोलले की कागदपत्र तयार करावे नंतर सेरी व इनाम दाखऊ मग भोवर गावचे पाटील चौगुले व गावचे बारा बलुते याची गोही व देशमुख व देसपांडे यांची दसतक जाहाली व हावलदाराचा सिका जाहला तेसमई खासा देशमुख खंडेराव व मातोश्री लाडूबाई व कारभारी धडफले नाना व कल्याणपत व निलो विठल देशपाडे होते सिका करते समई देशमुख गोदाजी बावा सितोले यासी बोलले की नाहावीच्या कजियाबदल लोकासी घोडी वाटली ते समई आह्मास काही दिले नाही तर त्या अवलादीचे एक घोड आह्मास द्यावे म्हणजे सिका करू तेव्हा सितोले मा।र बोलला की असी घोडी कोणकोणास देऊ हे गोस्टी आह्मास पुर्वत नाही तेव्हा मातुश्रीने देशमुखाचे हातचा सिका घेऊन पुण्यास आले मागाहून पाटील मा।र पुण्यास येऊन श्रीमंताची परवाणगी घेऊन जानोजी पाटील ढमढेरे तलेगावकर यानी मधेस्ती करोन मातोश्रीस समजाऊन महजरावर सिका केला.