Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)

ते लिहिले कैसे मोडते मग तुह्मी उभयतानी निकाल काढिला की तुमचे वडिली पूर्वी निरथडीचे पाच गाव सदर्हू सुरळीत केले त्यावरी भोगवटा पडला नाही त्यावरी कितेका दिवसा त्या वृत्तीचा खडोपती खर्चवेच करून जीर्णोध्दार केला त्यामध्ये आपली तक्षीम खर्च दिल्हियाने पोहचते पूर्वी व हाली खर्चवेच आपणाकडून पावला नाही यास्तव तेथील साहावी तक्षीम तुमची आमची ठरली त्यापैकी निमे तक्षीम तुमची व निमे आमची धाकुटपणाची आपली त्यापैकी निमे पांचा गावीचें कुलकर्ण व जोतीश चौथी तक्षीम तुह्मां पाचा भावास दिल्ही असे आणि मौजे सोनोरीचे जोसपण तुह्मापाशी निमे आपले तक्षिमेचे मागोन घेतलें त्याप्रमाणें तुह्मी मान्य केलिया तुमच्या वडिलाचे केले व आमच्या वडिलाचे लिहिले प्रमाण राहिले व भोळी वगैरे पाचा गावीचा खर्चवेच तुह्मी व तुमचे वडिलीं केला विभाग तक्षीमप्रमाणे आह्मी द्यावा तो हि तुह्मापासून आह्मी भाऊपणियाच्या नात्याने मागून घेतो ह्मणून तुह्मी आह्मास निर्मळ चित्त करून बोलिला त्यावरी आह्मी त्रिवर्ग भाऊ प्रसगी होतो एकत्र बसोन विचार केला की निंबाजीपत व बाजी निंबाजी हे भाऊपण्याने ऐसा निकाल काढितात तो भाऊपणियावरी दृष्टक्ष देऊन मान्य करावा मग खडो शिवदेव व लक्ष्मण माणकेश्वर व गोविंद गोपाळ या त्रिवर्गाने तुह्मास समत दिल्हे जे तुह्मी भाऊ आहा जे तुमच्या विचारास आले ते आह्मीं मान्य केले आह्मी त्रिवर्ग बोलिलो की मौजे सोनोरीचे कुलकर्ण व जोतीश तुमची तक्षीम निमे तुमच्या वडिलानी आमच्या वडिलास खर्चाबाबत लेहून दिल्ही त्यापैकी जोशपण तुह्मी आपले मागितले ते तुह्मास तुमचे निमे तक्षिमेचे दिल्हे व कुलकर्ण तुमचे तक्षिमेचे निमे आपणास वडिलाच्या लिहिल्यापैकी राहिले तें आपण घेतले भोळी वगैरे पाचा गावीची साहावी तक्षीम आमच्या घराणियाची त्यापैकी निमे तुमची पोहचते त्यापैकी तुह्मी आह्मास निमे तक्षीम कुलकर्ण व जोतीश दिल्हे ते आह्मी घेतले व निमे तुमची तक्षीम जोतीश कुलकर्ण आह्मी तुह्मास दिल्हे साहाव्या वाटियात चौथी तक्षीम करार जाहाली व साहाव्या वाटियात तुह्माबाबत चौथी तक्षीम आह्मा पाचास खर्चाबाबत राहिली व सोनोरीचे कुलकर्ण निमे तुह्माबाबत आह्मा पाचा भावास करार राहिले व भोळीचा खर्च तुह्मास भाऊपणियाकरिता सोडिला असे व सोनोरीचे जोतीश तुमचे मोकळे केले असे ऐसा सौरस तुमचा आमचा जाहाला मग तुह्मी आह्मी ऐसे घरात समजोन राजश्री मल्हार तुकदेव व राजश्री माहादाजी आबाजी पुरधरे देशपाडिये कर्यात सासवड याजपासी येऊन वृत्तात सागितला की घरामध्ये आह्मी भाऊपणियाने समजलो सदरहू करार तपसीलवार उभयतां निवेदित केला वेगलाले त्याणी नेऊन पुसिले त्यास करारास तफावत वचनात न पडला मग त्याणी उत्तर दिल्हे की भाऊपणियाने घरात तुह्मी समजलेत बहुत उत्तम केले या कराराप्रमाणे तुह्मी आपले पत्र निंबाजी बावाजीस लेहून देणे आणि निंबाजीचे तुह्मी पत्र लेहोन घेणे ऐसे त्याणी सागितले त्यावरी तुह्मी आह्मी घरास आलो विचार मानस आणिता पत्रे परस्परें असावी वृत्तीचा कारभार पुढे पुत्रपौत्रादिवशपरपरेने चालिले पाहिजे आणि सोनोरीचा व पाचा गावीचा तुमचा आमचा गरगशा वारे तो ऐसे परस्परे सुरळीतपणे पत्रे घ्यावी ऐसा निश्चय जाला मग हे पत्र तुह्मास आह्मी आपले खुशरजावदीने लेहून दिल्हे आणि तुमचे पत्र आह्मी खुशरजावदीने लेहून घेतले सदरहू निवाडियाप्रमाणे तुह्मी व आह्मी वर्तावे भोळी वगैरे पाच गावी सावे तक्षिमेत चौथी तक्षीम ठरवली भोळीचा खर्चवेच तुह्मी आह्मापासून सोडऊन घेतला सोनोरीच्या खर्चाबदल कुलकर्ण निमे तुमचे तक्षिमेचे तुह्मी आह्मास दिल्हे सोनोरीचे निमे भटपण तुमचे आह्मी मोकळे केले असे याउपर तुमचा व आमचा सोनोरीचा व पाचा गावीचा तक्षिमेबाबत व खचविचाबाबत कजिया राहिला नाही यासी कोण्ही अन्यथा वर्तणूक करील तरी त्यास श्री कुलस्वामीची शफत उभयपक्षी असे याउपर वतनाची पडझड पडेल ते तक्षीमप्रमाणे तुह्मी देणे व तक्षीमप्रमाणे आह्मी देत जाऊ उत्पन्न होईल ते तक्षीमप्रमाणे तुमचें तुह्मी घेत जाणे आमचे आह्मी घेत जाऊ आमचे कागद हरकोणा भावाबदाचे हातीचे व वडिलाचे वेळेचे देखील बनाजी मोरेश्वर व सभाजी माणकेश्वर जे काही तुह्माजवळ अगर कोठे दुसरे ठाई असतील ते तुह्मी माघारे द्यावे ऐसा करार केला कालकला कोठे चुकोन अगर तगाफलीने राहिले तरी ते रद्द असेत तुमचे कागदपत्र जे आपणाजवळ या कजियाबाबत असतील ते हि रद्द असेत हाली तुमचे पत्र घेतले व आह्मी पत्र दिल्हे त्यामध्ये तुमच्या वडिलाचे पत्र सोनोरीबाबत उगवले ह्मणून ते पत्र माघारे द्यावे ऐसा करार जाहाला सालीनहाल कोठे राहिले तरी ते रद्द असे हाली तुमचे पत्र तुमच्या पुत्राचे दस्तूरचे लेहून घेतले व हे पत्र तुह्मास लेहून दिल्हे आमच्या बुडातील भाऊ वश रामाजी परशराम व वश कृष्णाजी परशराम याचा तुह्मासी काही कथळा नाही ते व आह्मी आपले निमेमध्ये वाटणीप्रमाणे समजोन खाऊ व तुह्माबाबत सोनोरीचे निमे कुलकर्ण व भोळी व पाचा गावीचे तुमचे निमेपैकी निमे खर्चाबाबत आह्माकडे ठरावले ते विसाजी परशराम याचा वश असेल तो खाईल तेरीख छ ११ माहे साबान बिकलम खडो शिवदेव पानसी कुलकर्णी व जोतशी देहाय मजकूर अजे माणको विश्वनाथ सही

नकलल बिदस्तूर लक्ष्मण माणकेश्वर पानसी कुलकर्णी
जोतिशी देहाय मजकूर वंश विसाजी परशराम


                                               गोही

त्रिंबकराव माणकेश्वर आ।                             पत्रप्रमाणे साक्ष मलार तुकदेव व
देशमुख पा। शिरवळ                                   माहादाजी आंबाजी पुरंधरे जोतिसी व
                                                              कुलकर्णी का। सासवड व देसापांडिये
                                                              कर्यात मजकूर