Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
-२ [स्खद to stop. खाडा म्ह० stop ] दुधाचा खाडा म्ह. stop of milk.
-३ [ खाडः = खाडा. खडि भेदने ]
-४ [ खातः (खणलेला चर) = खाडा, खड्डा] (भा. इ. १८३६)
-५ [ खद् स्थैर्ये. खादः = खाडा. खदः = खडा ] दुधाच्या रतिबाचा खाडा पडला म्हणजे रतिबाची गती बंद पडली.
कानीं खडा म्हणजे आवाजाची गती बंद पडणें.
खाडी [ खातिका ] (खाडा १ पहा)
खांडी [ खंड:, खंडिका ] (खांड पहा)
खाडू [ षंढः = खाडू (diminution ऊ) ]
खाणें १ [ खै-खायति = खातें. खान = खाणें ] खाणें म्ह० दु:ख देणें, पीडा करणें. (भा. इ. १८३६)
-२ [ क्षम् = खावं. क्षांत्वा = खाऊन ]
राग खाऊन = रागं क्षांत्वा.
खाणें म्ह० राग, क्रोध, गम वगैरे. (भा. इ. १८३४)
खांणे (मन) [ माझें मन मला खांतें, या वाक्यांत खांणें हा धातु संस्कृत क्षण् पासून निघाला आहे. क्षणणं = खणणं = खांणें ] खांतें म्हणजे इजा करतें. ( भा. इ. १८३४)
खात [ ख्याति = खात ]
खातापिता [ ख्यातापत्यः = खातापता = खातापिता ] खातापिता माणूस म्हणजे पोरेंबाळे झालेला मनुष्य. खाण्यापिण्याशीं मूलतः कांहींएक संबंध नाहीं.
खांदणें [ खांदा den मराठी ]
खांदा [ स्कंधक = स्कंधअ = स्कंदअ = खांदा ] (स. मं. )
खादी १ [ खादिका = खादी ( वस्त्रविशेष ). खद् आच्छादने ] आच्छादण्याचें वस्त्र.
-२ [ खाद्]
खांधटी [ स्कंधास्थि ] ( खामटा पहा )
खापरतोंड्या [ खर्परतुंडः = खापरतोंड्या ]
खांब १ [ खांब हा शब्द स्कंभ या शब्दापासून निघाला आहे; स्तंभ या शब्दापासून निघाला नाहीं. कुठरो दंडविष्कंभ: (अमर-द्वितीय कांड-वैश्यवर्ग-७४) विष्कंभ = स्तंभ] ( भा. इ. १८३३)
-२ [हा मराठी शब्द संस्कृत स्तंभ, महाराष्ट्री खंब्भ, अशा परंपरेनें निष्पन्न झाला, म्हणून प्राकृत वैय्याकरण समजतात; परंतु ती चूक आहे. स्तचा महाराष्ट्रांत त्थ, थ, थ्थ होईल. क्ख, ख होणार नाहीं. पुण्यस्तंभ = पुणथंब; रणस्तंभोवीं = रणथंबोर; या स्थलीं स्तचा थ यथार्थ झालेला आहे. खांब या मराठी व क्खंभ या महाराष्ट्री शब्दांतील ख स्तपासून निघालेला नाही; स्कपासून निघालेला आहे. पाणिनीय स्कंभ् धातूपासून महाराष्ट्री क्खंभ व मराठी खांब निघालेला समजणें युक्त आहे.] (भा. इ. १८३२)