Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
खांबटी [ कक्षापुटी, स्कंधपुटी, स्कंधास्थि,} = खांबटी, खामटी the part of body near the sholder blade above or under ] खांबटीला धरून ओढणें.
खांबुल्यो [ खाबुल्लो (खांब, स्तंभ ) ] हा हि शब्द खेळांत योजतात. प्राकृत आहे. ( भा. इ. १८३२)
खामटा [ स्कंधास्थि = खांधटी, खामटी, खामटा ]
खामटी [कक्षापुटी, स्कंधपुटी, स्कंधस्थि] (खांबटी पहा)
खाय [ क्षाति ] ( खाई पहा )
खार १ [ क्षारितं = खार ] क्षारित म्हणजे अपराध, दोषपदराला खार लावणें म्हणजे अपराध, दोष पदरीं बांधणें.
-२ [ क्षार = खार. क्षारः म्हणजे रस ] लोणच्याचा खार म्हणजे रस.
खारट [ क्षरिष्ट = खारिट = खारट ] (भा. इ. १८३२)
खारिक [ खर्जूरिका = खारिक ]
खाल (लीं) [ खतल = खअल = खाल] ख म्हणजे खळगा, रिकामी जागा. (भा. इ. १८३४)
खालीं [खात = खाल= खालीं (सप्तमी) ] संस्कृत भूतकालवाचक धातुसाधिताच्या तचा प्राकृतांत व मराठींत ल होतो.
खात म्ह० खणलेलें, खड्डा; त्यावरून अधोभागींची जागा. घर खाली करणें, ह्या वाक्यांतील खाली शब्द फारशी आहे. त्याचा अर्थ रिकामें. ह्या फारशी खाली शब्दाच्या ईकारावर अनुनासिकाचा बिंदु नाहीं. (ग्रंथमाला)
खास [ काश्यं = खास ] काश्य म्ह० दृश्य, स्पष्ट. हें खास आहे म्ह० स्पष्ट आहे. (आगाशी पहा)
खिख्या [ किखिता = खिखिआ = खिख्या ] किखि म्ह० माकड. किखिता म्ह० मर्कटपणा. खिख्या म्ह० माकडचेष्टा, थट्टा.
खिचडी १ [ कृसरं, कृसरिका = खिचडी. कृ = खि. स = च. र =ड.]
-२ [ कृशर: = किचडा = खिचडा. ( स्त्री. ) खिचडी ] तांदूळ व डाळ यांचें अन्न म्हणजे कृशर. ( भा. इ. १८३५)
-३ [ कृशरा = किचडी = खिचडी ]