Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

ओलेलें [ आर्द्राद्रं = ओलेलें पतितपतितं = पडलेलें
गतगतं = गेलेलें शुष्कशुष्कं = सुकलेलें
मृतमृतं = मेलेलें पक्कपक्कं = पिकलेलें ]
ज्वलितज्वलितं = जळलेलें

ओवरी [ अपवरक = ओवरअ = ओवरा = ओवरी.
अपसरक = ओसरअ = ओसरा = ओसरी ] (ग्रंथमाला)

ओंवळें [ औमदुकूलं. औम (ताग, सण यांचें) ] (सोंवळें २ पहा)

ओवा १ [उपाय = उवाअ = ओवा ] ओव्यानें रोग जातो आहे तेथें मंत्र कशाला ? असा प्रयोग मराठींत हरहमेश करितात. येथें ओव्यानें म्ह० औषधोपायानें. ओवा नामक तिक्त वनस्पतिबीजाचा येथें कांहींएक संबंध नाहीं. (भा. इ. १८३४)

-२ [ यवानः = ओवा ] ,,

-३ [ ओतुः = ओउ = ओवा (सुईचा टांचा) ]
चोळीच्या बाहीला किती ओवे घेतले ?

-४ [ओतु (वै to weave) weft = ओतुक = ओवा ] stitch.

ओवाळ [उपालंभस्व = उवालह = ओवाळ (दोष दे)] आपल्या कर्माला ओवाळ (अत्तणी जेवणं उवालह). (भा. इ. १८३२ )

ओवाळणें [वल् फिरविणें णिच्. उपवालनं = ओवाळणें ] दिवे ओवाळणें म्ह० तोंडाभोंवतीं फिरविणें. (धा. सा. श.)

ओशट् [ वषट् (अग्नींत टाकावयाचें आज्य) = ओशट्] ओशट् म्ह० तुपट.

ओशट, ओशेट [अवशिष्ट =ओशिट्ट= ओशेट=ओशट] (भा. इ. १८३२)

ओस [ अ + उषित = ओसिअ = ओस. अवस = ओस ( निर्जन ) ] (भा. इ. १८३४)

ओसंग, ओसंगा [ उत्संग: = ओसंग, ओसंगा]

ओसरणें [ अवसरणं = ओसरणं = ओसरणँ = ओसरणें ] (ग्रंथमाला)

ओसरी [ अपसरक = ओसरअ = ओसरा = ओसरी ] (ओवरी पहा )

ओसाड [ सृज् ४ विसर्गे, उत्सृष्ट= ओसाड, उद्धरोत्सृजा = धरसोड, निसृष्ट = निसट ] ( धा. सा. श. )

ओसाणें [ उत्सन्न decayed matter = ओसाणें ] कुजलेलें कसपट.

ओहर - नव्या नवरीला व नवर्‍याला कुळदेवतेच्या स्थानाला नेण्याची चाल महाराष्ट्रांत सार्वत्रिक आहे. वधूवर = वाहूअर = वोहर = ओहर, अशा पायर्‍यांनीं हा शब्द साधलेला आहे. ओहरें म्हणजे वधूवरांना कुळदेवतेला नेण्याचा सांप्रदाय. ( सरस्वती मंदिर श्रावण १८२६ )

ओहोटी [ अवभृष्टिः = ओहोटी ] ( धातुकोश-आहोट पहा)

ओहोबाप [वोढृवृप्तृ = ओहोबाप ] वराचा बाप.

ओहोमाय [वोढृमाता = ओहोमाय ] वराची आई.

ओळ [ आवलि = ओळ ]

ओळख [उल्लेख = ओळेख = ओळख ( आठवण ) ] वस्तुतः पूर्वगोष्टीची आठवण या अर्थी ओळख असा मूळ शब्द. परंतु अवलक्ष म्हणजे पहाणें या अर्थी जी ओळख शब्द आहे त्याच्यासारखाच ह्या ओळेख शब्दाचा उच्चार सध्यां मराठींत झालेला दिसतो. त्यानें सूर्य, गुरु, बुध हे तारे ओळखले म्हणजे चांगले स्पष्ट पाहिले. (भा. इ. १८३४)

ओळखून [ लक्ष् १० अङ्क ने. उपलक्ष्य = ओळखून] राज्ञा तु तत्फलं उपलक्ष्य तत्पारंपर्य विचार्य । (सिंहासनद्वत्रिंशतिका) ( धा. सा. श.)

ओळंबा [वलंबः ] ( वळंबा पहा)

ओळें [ अशुक्ल = असुकल = अहुअल = अउअळ = ओअळ, ओवळ, ओळ (ळा-ळी-ळें) ] अशुक्ल वस्त्र म्हणजे ओळें वस्त्र. मी इतक्या दिवस ह्या शब्दाचें व्युत्पन्न नानाप्रकारें करून पाहिलें; परंतु खरी व्युत्पत्ति सांपडावयाला हा काल लागला. (भा. इ. १८३४)