Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
औ
औट १ [ अध्युष्ट ] (आउट पहा)
-२ [अर्धचतुर्थ = अर्ध च तत् चतुर्थ च, एक दोन तीन असे पदार्थ मोजून चवथा पदार्थ जो होता तो अर्धा होता. तेव्हां अर्ध चतुर्थ म्हणजे तीन आणि चवथा जो अर्धा तो म्हणजे औट. अर्धचतुर्थ = अद्धट्ट = अउट्ट = औट ] अर्धचतुर्थी मात्रा ( गोपथब्राह्मण - पूर्व - प्रथमप्रपाठक) = औटावी मात्रा, साडेतीन मात्रा. (भा. इ. १८३४)
औत [ आवप्त = आउत्त - आउत = औत ] आउत म्हणजे पेरलेलें. त्यावरून पेरण्याचें यंत्र, क्रिया. आउताचा नांगर, आउताचा बैल, असा बोलण्याचा व्यवहार आहे. ( भा. इ. १८३३)
औत, औति [ आहुति ] (आउति पहा )
औदसा [ अपसदा ] (अवदसा पहा)
औशीं [ आवसतिः ] (आवशीं पहा)
औंदा [ आइंदह् (फारसी)] (यंदा पहा)
औस [ उषस् ]
औळून [ आकुलीकृत्य = आउळून = औळून, आवळून] नयने आकुलीकृत्य = डोळे औळून.