Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
ओ
ओकणें [ आवच्= आऊक = ओक. आवचनं ओकणें ] बोलणें. (भा. इ. १८३४)
ओकल (ला-ली-लें) [उक्त वच् निष्ठा + ल (स्वार्थक)= उक्क + ल = ओकल (ला-ली-लें ) ] ओकला म्हणजे बोलला. तो काय काय ओकला ? म्हणजे तो काय काय बोलला ? ( भा. इ. १८३४)
ओकसा बोकशी [ बुक्क कुत्र्याप्रमाणें शब्द करणें ] (भोकणें पहा)
ओ का टो [ उ ११ शब्दे ( आवाज करणें ) + ट: किंवा ठ: (एक प्रकारचा आवाज) = ओ का टो ] अजून त्याला ओ का टो करतां येत नाहीं म्हणजे नीट शब्दही उच्चारतां येत नाहीं. ( धा. सा. श. )
ओकारा [गृ ६ निगरणे. उद्गार = ओकारा; उद्गारिका = ओकारी. उद्गरणे वमने उद्गार: (अमरकोश)] (धा.सा.श.)
ओकारी १ [उद्गारिका ] ( ओकारा पहा )
-२ [ अवक्रिया = ओकारी. अवक्रिया नाम तिरस्कार ]
मला त्या गोष्टीची ओकारी आली.
-३ [ वमकारः - रिः = ओंकारी, ओकारी ] Making vomiting.
ओंकारी १ [ ओंकारिका = ओंकारी. ओंकार: म्ह० कुरकुर करणें ] मला त्या माणसाची ओंकारी आली म्ह० त्याजबद्दल मी कुरकुर करूं लागलों.
-२ [ वम्कारः - रिः ] ( ओकारी ३ पहा )
ओकें १ [ ओख् १ शोषणे. ओख्यं = ओकें ] नाक नथेवांचून ओकें दिसतें म्ह० शुष्क दिसतें. ( धा. सा. श.)
-२ [अवमुक्त taking off of garments, ornaments etc. = ओकें ] नाक ओकें दिसतें म्हणजे नथ काढून ठेवून नाक मोकळें दिसतें.
ओक्साबोक्षी, ओक्साबोक्षीं [ उक्ष् १ सेचने. ( आ + उक्ष्) ओक्ष् to sprinkle. ओक्षव्योक्षम् crying so as to sprinkle the chest with tears] ओक्साबोक्षीं रडणें. ( धा. सा. श. )
ओंगण, ओंगणें [ अंज् १० आप्यायने. अंज = ओंग. अंजनं = ओंगण, ओंगणें ] ओंगणें म्ह० वंगण लावणें. ( धा. सा. श. )
ओंगळ [वि + अमंगल = व्यमंगल = ओंगळ ] (धातुकोश-ओंगळ पहा)
ओंगळवाणा [ अमंगलवर्ण: = ओंगळवाणा ]
ओंगाई [उप + गै to sing to ] आंगाई ओंगाई बाळाची मंगाई.
ओचकारा १ [ अव + स्कर: = ओचकारा ] (धातुकोश-ओचकार २ पहा)
-२ [ व्रश्च + कृ = ओचकारा] ( धातुकोश-ओचकार ३ पहा)
ओचा १ [उत्संगः = ओचा. स = च ]
-२ [ उच्चय = उच्चअ = ओचा = ओंचा ] (ग्रंथमाला)
-३ [ अवचय = ओचअ = ओचा ] अवचय म्ह० वस्त्राचा पायघोळ. ओचा खोवणें म्ह० पायघोळ वर बांधणें. (भा. इ. १८३३)
ओच्या [ आहोस्वित् = होच्चिअ = होच्या = ओच्या (निपात) ] (भा. इ. १८३४ )
ओज [ ऊर्जा = ओज ] घराची ओज आंगण सांगतें.
ओजवणें [ ओज् १ सामर्थ्ये ] ती मुलगी ओजवत् चालली आहे म्ह० तिला तजेला येत चालला आहे. (धा. सा. श.)
ओंजळ १ [उदञ्जलि ( the hollow palms raised up ) = ओंजळी, ओंजळ ]
-२ [ अंजलि = ओंजळ ] (स. मं.)