Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
द
दगड ( निपात ) १ [ धगित् = दगिड = दगड ] ते काय दगड काम करते ? (भा. इ. १८३४)
-२ [ दग्धः = दगड, दगड्या ] दग्ध म्हणजे निंद्य. तूं दगड आहेस म्हणजे निंद्य आहेस.
दगदग [ दघ् ८ घातने, दघदघ = दगदग ] दगदग म्ह० घात, नुकसान, आयास. ( धा. सा. श. )
दंड [दंड (प्रणाम) = दंड ] फारसींत ज्यांना जोर म्हणतात त्यांना च मराठींत दंड म्हणतात. दंड काढले म्हणजे जोर काढले. दंडप्रणाम म्हणजे काठीसारखें जमिनीवर पडून नमस्कार करणें.
दडपणें [ दर्भयति ( दृभी भये ) = दरभ = दडब = दडप + णें = दडपणें ( अकर्मक, भिणें या अर्थी ) ] माझी छाती दडपली म्हणजे भयाली. (भा. इ. १८३७)
दडप्या १ [ दर्पयति = दडपणें. दर्पकः = दडप्या ]
-२ [ दृढपतिः = दडपइ = दडप्या ] तिचा दडप्या म्ह. धणधाकट नवरा.
दंडवत [ दंडवत् पतनं असा संस्कृत प्रयोग. पैकीं प्रथमार्धक जो दुंडवत् शब्द् तोच मराठींत रूढ झाला आहे.] दंडवत् म्हणजे मूळार्थ दंडाप्रमाणें, लाकडाप्रमाणें. दुसरा अर्थ शूद्रादिकांचा प्रणिपात.
दंडुक्या १ [ दंडुक: ( wicked वैजयंती) = दंडुक्या ]
-२ [(सं.) दुंडुक (लुच्या, अप्रामाणिक) = दंडुक; दुंडुकिक = दंडुक्या ] मूळचा अर्थ लुच्चा; दुसरा अर्थ शिरजोर. (भा. इ. १८३३)
दणका [दंडढक्का = दणका ] दणक्याचें (दंडढक्कीय) लग्र.
दणकाव [धृष् १० प्रहसने. धृष्णजकाम्य = दणकाव] ( धा. सा. श. )
दणक्या [धृष्णक् = दणक्या ] धृष्णक् म्हणजे अविनीत, उद्धट, इ. इ.
दंताळें [ दात्रालि = दाताळें = दंताळे] शेतकर्याच्या औतांपैकीं एक.
दंताळ्या [ दंतिल: = दंताळ्या ]
ददात [ दद् १ दाने. ददतिः = ददात
दध् १ दाने. दधतिः = दधात ]
हे दोन्ही उच्चार आहेत व दोन्ही निरनिराळ्या धातूंपासून निघाले आहेत. (धा.सा.श.)