Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

हातुल्यो [ हत्थुल्लो (हस्त, हात ) ] कित्येक खेळांत अटींतून सुटावयाचें असलें, म्हणजे पोरी किंवा पोरें हा शब्द उच्चारतात. हा शब्द प्राकृत आहे. थुल्ल्यो, असें हि रूप आढळतें. (भा इ. १८३२ )

हातोटा, हातोटी [हातोडा पहा ]

हातोडा [ हस्त ११. हस्तपट्ट = हातवडा = हातोडा. हस्तपट्ट = हातवटा = हातोटा. हस्तवृत्तिः = हातवटी = हातोटी ] ( धा. सा. श. )

हात् तिच्या वहिन ! [ (सं.) हा धिग् हा धिग् च भगिनि ! ( प्रा.) हध्धी हध्धी च बहिणि ! = (म.) हात्तिच
बहिन ! = हात् तिच्या बहिन ! ] वस्तुतः ह्या अपभ्रंशांत अपशब्दाचा लेशहि नाहीं. (ग्रंथमाला)

हादरणें [ ह्राद् १ अव्यक्ते शब्दे ] जमीन हादरली. ( धा. सा. श. )

हांदोळ [आंदोल्]

हापटणें [ आपाटनं = हापटणें, आपटणें ] (भा. इ. १८३६)

हामरी तुमरी वर ये [ अहं रे त्वं रे ] (हमरीतुमरी पहा)

हामीहामी [ अहमहमिका = हामीहामी ] तो हामीहामी करीत आला. मयूरव्यंसकदिगणांत हा शब्द आहे.

हाय १ [ हय् १ गतौ. हाय = हाय ] क्षीण होणें, थकणें एतदर्थक अव्यय. (धा. सा. श.)

-२ [ आक्रायः ( अग्नि ) = हाय ] अग्नि. मुलांना विस्तव दाखवितांना हा शब्द योजतात.

-३ [ हर्य् १ गतिकान्योः. हर्या = हाय ] हाय घेणें, खाणें, धमकीनें भयभीत होणें. ( धा. सा. श. )

हायचा (चा-ची-चें) [ इहत्य = हैच्च = हायच (चा-ची-चें)] हा शब्द गांवढे सध्यां योजतात. हायचा म्हणजे इथचा. (भा. इ. १८३४)

हाँयचा १ [ इहत्यः = हैंचा, हाँयचा ] एथचा.

-२ [ ह्यस्त्यः ] (हैंचा पहा)

हार १ [ हरिः = हार (स्त्री). हृ १ हरणे ] द्यूतांत पराजय.

-२ [( आहार) आहृति = हरि, हार (स्त्रीलिंगी) ओळ, रांगा. (भा. इ. १८३६)

-३ [ हारिः (प्रवाशांचा तांडा, ओळ) = हार (स्त्री.)]

हारा [ हार: (हमालाची पांटी) = हारा]