Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
हुडुत् तुझा बा झवँ - हुडुत् तव पिता तावत् किंवा यावत् = बैल तुझा बाप तर ह्याहून या वाक्यांत जास्त गर्ह्य भाग नाहीं. हुड़त्, झवं वगैरे शब्दांचे अर्थ न कळल्यामुळें हीं असलीं वाक्यें गालिप्रचुर भासतात. महाराष्ट्रांत असलीं वाक्यें रागांत, थट्टेंत लहानथोरांच्या बोलण्यांत हमेशा येतात. त्यांचा खरा अर्थ न कळल्यामुळे महाराष्ट्रांतील सरसगट सर्व लोक अभद्र भाषण करणारे असतात, असा कित्येक परदेशीयांचा अभिप्राय पडला. तो अर्थात् अज्ञानजन्य होता, हें उघड आहे. (भा. इ. १८३४)
हुडुत [ हिरुत् वर्जने अव्ययं । ( अकच्) हिरकुत् = हिडउत् = हिडुत् = हुडुत् ] हुडुत् निघ येथून; हुडुत् तुझा हल्या मारी; वगैरे वाक्यांत हें वर्जनार्थक अव्यय मराठींत योजतात. (भा. इ. १८३६)
हुनका [ सुवर्णकः = हुनका ( होन in सुवर्ण = होन ) ]
हुर, हुर [ उर् गतौ ( सौत्रधातू) Imp. २nd sing. उर उर go on, go on हुर हुर ] a cry when driving sheep.
हुश् हुश् [ उत्+ श्वस् = हुश् हुश्, हुस् हुस् ] to breath out heavily.
हुष् ! हुश् ! [ उष् दाहे. उष् उष् = हुष हुष् ] हुष हुष करणें म्हणजे दाह झाल्याचा दर्शक शब्द करणें.
अति उकाडा किंवा दाह झाला असतां मराठींत हा उद्गार निघतो. ( धा. सा. श. )
हुसहुस् [ उत्+ श्वस् ] (हुश् हुश् पहा)
हुळा [ होलक = हुलअ = हुळा (हरभर्याचा) ] (भा. इ. १८३४)
हूँ [ ऊम् = हूँ (क्रोधनिंदामत्सरदर्शक अव्यय ) ]
हूड [ हूड् गतौ ] हूड मुलगा = भटकणारा मुलगा. (ग्रंथमाला)
हूद [ उद्र ( पानमांजर) = ऊद = हूद ] पानमांजर. (भा. इ. १८३६ )
हूल [हवरि: = हूरि = हूलि = हूल. हवृ कौटिल्ये] false news, report. हूल म्हणजे कुटिल, खोटी बातमी.
हे [ एतद्, अदस्, इदम् ह्या तीन सर्वनामांपासून स्त्रीलिंगी रूप, प्रथमा एकवचन. ही हें रूप अर्वाचीन आहे.] ( ज्ञा. अ. ९ पृ. ३ )