Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

लाफ्या [ लंफ = उडी मारणें. लाफ्या = लंफक = उड्डया मारणारा = बोलतांना उड्या मारणारा = गप्पा ठोकणारा ] (भा. इ. १८३२)

लांबगा [ लंब + क ] (पोरगा पहा )

लांबबिंब [ लंबविलंब = लांबबींब = लांबबिंब. विलंब = बिअंब = बिंब ] (भा. इ. १८३४)

लाभ [ विक्रेत्रा मूलादधिकं प्राह्यं लाभः । ] धान्य मापतांना पहिल्या अधोलीस लाभ म्हणतात. लाभ म्हणजे वाढीची व्याजाची अधोली. ती पहिल्यांदां काढून घेत.

लाभणें [ लाभपासून नामधातू] धान्य मापतांना पहिल्या अधोलीस लाभ म्हणतात. प्रयासानें कोणास पहिला मुलगा झाला म्हणजे मुलगा लाभला म्हणतात. ( धा. सा. श.)

लामणदिवा १ [ लावण्यदीपक = लामणदिवा ] (भा. इ. १८३२)

-२ [ लावण्यदीपः = लावणदिवा, लामणदिवा ]

लारी [ लेहिताखारी ] (कहारी पहा)

लालडी [ ललाटिका (तिलकविशेषः ) = लल्लटिका = लालडिआ = लालडी ] ornament. कपाळावर बांधण्याचा एक दागिना.

लालुच [लोलुंचा = लालुच]

लालुचणें [ लुञ्च् १ अपनयने. लोलुञ्च्यते = लालुचणें ] ( धा. सा. श. )

लावणी [ मूळ संस्कृत शब्द लापनी. त्याचें प्राकृत लावणी] ह्या लावण्या महाराष्ट्रांतील लोकांच्या तोंडीं आज दोन हजार वर्षांपासून आहेत. शृंगार, प्रेम वगैरे विषयांवर लापनी ऊर्फ लावणी गाण्याचा छंद इतर कोणत्याही राष्ट्रांतल्यापेक्षां महाराष्ट्रांतील लोकांना विशेष आहे. ( सरस्वतीमंदिर श्रा. १८२६)

लावणीसंचणी [ लापनीसंचयनी = लावणीसंचणी ]

लावालाव १ [ लामकालामकं = लावालाव. लमकस्य भावः लामकं. लामकं + आलामकं= लामकालमकं. ] लमक म्हणजे जार, दुष्ट पुरुष. त्याचा गुण तो लावालाव.

-२ [ लापालापिका = लावालाव ] लावालाव म्हणजे बोलून भांडण लावणें.

लाहालाहा १ [ लष् ( द्वि. ) ] ( धातुकोश-लाहालाहाकर पहा)

-२ [ लभ् १ प्राप्तौ. लालभः = लालहा = लाहालाहा लभचा क्रियासमभिहार ] लाहालाहा म्हणजे मिळविण्याची अतिशयित हाव. ( धा. सा. श.)