Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
लांकुड [ लकुटः = लगुडः = } लकुड = लाकुड, लाकडी, लकडा.
लगुरः = लगुरी = लगोरी ( डाव ). (भा. इ. १८३२)
लाख १ [ लक्तक = लाख ]
-२ [ लाख् १ अलमर्थे. लाख्यः = लाख्या, लाख ] लाख माणूस म्हणजे कामाला पुरेसा माणूस. लाख्या बारगीर म्हणजे समर्थ बारगीर. ( धा. सा. श. )
-३ [ लाघ्, लाख् सामर्थ्ये. लाख = लाख, लाख्या ] लाख माणूस म्हणजे समर्थ माणूस. लाख्या बारगीर म्हणजे समर्थ, शूर शिपाई. लायक या फारशी शब्दापासून ल्याक् हा शब्द मराठीत आला आहे. त्याचा व समर्थार्थी लाख शब्दाचा कांही एक संबंध नाहीं. (भा. इ. १८३४)
लाखणी [ श्लक्ष्णिका = लाखणी सुपारी ( मऊ चिकण सुपारी ) ]
लाखाटणें [ लाख् १ शोषणे. लाक्षाक्तं = लाखाट (क्रियापद लाखाटणें ) ] लाखाटणें म्हणजे लाखेनें माखणें. ( धा. सा. श. )
लाखोली [ लक्षावालि = लाखोली ]
लाख्या १ [श्लाघ्यः = लाख्या ] श्लाध्यः बारकीरः = लाख्या बारगीर.
-२ [ लाघ्, लाख् सामर्थ्ये ] ( लाख ३ पहा)
-३ [ लाख् अलमर्थे ] (लाख २ पहा)
-४ [ लाख् to be competent) लाख्या बारगीर competent horseman.
लागणें १ [ लाघ्, राघ् १ सामर्थ्ये. लाग ] आम्हास लग्नास मणभर साखर लागली. ह्या कामास १०० माणसें लगतात. ( धा. सा. श. )
-२ [ लग् १ सङ्गे, गतौ. लग् ( बंद होणें ) = लागणें ( बंद होणें ) ] घर लागलें म्हणजे बंद झालें, पडलें, रिकामें झालें. ( धा. सा. श. )
-३ [ राखृ, लाखृ शोषणे. राखनं, लाखनं = लागणें ] तो मरीनें, प्लेगानें लागला म्हणजे शुष्क झाला. (धा. सा. श.)
लागलेंच [ द्राकच = (ल प्रलय लागून) लागलाच - लीच - लेंच. द्राक् म्हणजे जलद, तत्काल; तोच अर्थ लागल या शब्दाचा आहे. मराठींत विशेषण आहे; संस्कृतांत अव्यय आहे.] (भा. इ. १८३३)