Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
लव १ [ लोमन् = लव ] (स. मं.)
-२ [ लव (कालाचा अंश) एकोनपंचाशदुच्छवासप्रमाण: काल: लव: ] लवमात्र डोळा मिटेना म्हणजे अत्यल्प काल इ. इ. इ.
लवंगी [ ललामगु = लवंगी ] ललामगु हा शब्द शिस्नार्थी तैत्तिरीयसंहितेंत आला आहे. ललामगु चें स्त्रीलिंग ललामगिका. त्यापासून मराठी लवंगी. लहान मुलांच्या शिस्नांना बायका लवंगी म्हणतात.
लवघा, लवंघा [ लंघः (शोप ) ] ( धातुकोश-लवंघ पहा)
लवंडणें [लोड् १ उन्मादे. लौड = लवंडणें, लवडणें. लौड: ( लिंग ) = लौडा ] ( धा. सा. श. )
लवडसवडी (अव्यय) [ सपदि (तात्काळ at once, without delay, hurriedly ) = सवडी ]
लवणें १ [ ली ९ श्लेषणे. ली = लवणें ] डोळा लवतो म्हणजे खालीं वर होतो. ( धा. सा. श. )
-२ [ नमनं = लवणँ = लवणें. न = ल ] थोरांपुढे लवावें म्हणजे नमावें. (भा. इ. १८३७)
लव बाई लव [ लम पुत्रि लम = लव बाइ लव ] अगदीं दोन तीन वर्षांच्या मुलींचें खेळतांना म्हणण्याचें गाणें आहे. त्यांत आई म्हणते लव बाई लव. येथें लव हा शब्द लम् ( रमणे ) या धातूपासून निघाला आहे. लम = रमस्व = लव. लम् हें रम् चें प्राकृत रूप आहे. रम आत्मने परंतु लम परस्मै. लव बाई लव म्हणजे रम पोरी रम, खेळ पोरी खेळ. (भा. इ. १८३६)
लव लव [ लप लप = लव लव ] लव लव साळू बाई, मामा येतो speak o darling, your uncle is coming.
लव्हाळा [ लघुलय: = लव्हाळा ]
लस [ लसीका = लस ]
लसालसा [ लप् to long for = लसालसा खातो ]
लहंगा १ [ ह्रग् to cover ]
-२ [ हलग: ( हलग to cover ) = लहगा = लहंगा ] petty coat.
लहान [ लघीयान् + लहान ] (ज्ञा. अ. ९ पृ. ६४) [ लघीयान् = लहीआन् = लहान ] अति बारीक. (ग्रंथमाला)
लहानगा [ लघीयस् + क] (पोरगा पहा )
-ला १ [ आरे ] (स १ पहा)
-२ [ आरात् ]